जळगाव : कोरोना लसीकरण आणि रक्तदान याबाबत अनेक समज गैरसमज असून कुठलेही गैरसमज मनात न ठेवता निकषानुसान जर तुम्ही कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला असेल तर चौदा दिवसांनी तुम्ही रक्तदान करू शकतात, अशी माहिती सिव्हील रक्तकेंद्राचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. आकाश चौधरी यांनी दिली आहे.
राज्य रक्तसंक्रमण परिषदेकडून याबाबत तशा मार्गदर्शक सूचनाच आलेल्या आहेत. आधी दोनही डोसनंतर २८ दिवसांनी तुम्हाला रक्तदान करता येत होते. मात्र, हे निकष नंतर बदलवून आता पहिला किंवा दुसरा कोणत्याही डोसनंतर तुम्ही १४ दिवसांनी रक्तदान करू शकतात. तरूणांनी लसीकरणानंतर १४ दिवसानंतर रक्तदान केले तर ते फायदेशीरच आहे. रक्ताची निकडही यात भागते, असेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.
कोविडनंतर १४ दिवस योग्य
कोविड बाधित रुग्णांनी बरे झाल्यानंतर पुन्हा टेस्क् केल्यास ती निगेटीव्ह आल्यास ते चौदा दिवसांनी रक्तदान करू शकतात. किंवा बरे होऊन घरी गेल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करू शकतात.