लोकमत ऑनलाईन पारोळा, दि.5 : येथे नुकत्याच साजरा झालेल्या ब्रrाोत्सवात श्री बालाजींच्या हुंडीत यंदा भाविकांकडून तीन लाख रुपयांचे रोख स्वरुपात दान टाकण्यात आले आहे. यात 4 ग्रॅम सोने, 3 भार चांदी आणि शंभर रुपये मुल्याचे जपानी नाणे देखील दान केले आहे. बालाजी मंदिर प्रशासनाकडून 3 नोव्हेंबर रोजी सीलबंद दानपेटी उघडण्यात येऊन भक्तांकडून मिळालेल्या दानाची मोजदाद करण्यात आली. सुमारे सहा तास विश्वस्त तसेच बालाजी स्वयंसेवक समितीच्या सदस्यांनी ही मोजदाद केली. यात दोन लाख 96 हजार रुपये रोख, 4 ग्रॅमच्या सोन्याच्या वस्तू आणि 3 भार चांदी व एक जपानी नाणे होते. गेल्या पाच महिन्यात भाविकांकडून दानपेटीत हे दान टाकण्यात आले होते. या वेळी संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी, कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, विश्वस्त प्रकाश शिंपी, अरुण वाणी, रमेश भागवत, दिलीप शिरोडकर, भटू शिंपी, प्रमोद शिरोळे, राजू वाणी, मनीष अग्रवाल, दिलीप गुजराथी, चंदूलाल पाटील, दीपक पाटील, सुजित शेंडे, निखिल वाणी , शैलेश पाटील, रमेश शिंपी, अशोक मेटकर, समर्थ शिंपी, दीपक शिंपी, हर्षल शिरोळे आदि उपस्थित होते. या दानातून मंदिराचा दैनंदिन खर्च भागविला जाईल असे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.
पारोळा येथील बालाजीच्या हुंडीत भाविकांनी टाकले तीन लाखांचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 6:51 PM
पारोळा येथे भाविकांनी तीन लाखांचे दान बालाजीच्या हुंडीत टाकले असून यात सोने- चांदी आणि विदेशी चलन देखील आढळून आले आहे.
ठळक मुद्देविश्वस्त मंडळाकडून दानाची मोजदादतीन लाखांतून बालाजी मंदिराचा दैनंदिन खर्च भागविला जाणार