जळगाव : समाजाचे ऋण फेडावे, या भावनेतून सावखेडा परिसरातील मातोश्री आनंदाश्रमास मधुकर नेवे यांनी १० लाखाची देणगी दिली असून या निमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार केला. या सोबतच सेवाकार्य करणाऱ्यांविषयीदेखील कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सचिव रत्नाकर पाटील, मातोश्री आनंदाश्रमच्या प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया, सत्कारार्थी मधुकर नेवे व मालती नेवे उपस्थित होते.
याप्रसंगी मातोश्री आनंदाश्रमातील आजी-आजोबांना आरोग्यसेवा देणारे डॉ. राजेश डाबी, डॉ. अमोल पाटील, डॉ. विवेक जोशी, डॉ. सुनील कुलकर्णी व गणानाम सत्संग परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. अतुल सरोदे, डॉ. प्रियदर्शनी सरोदे, डॉ. प्रताप जाधव, डॉ. अभय गुजराथी, डॉ. परीक्षित बाविस्कर, डॉ.चंद्रकांत कोतकर, डॉ.अमेय कोतकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रास्ताविक अनिता कांकरिया यांनी केले तर सूत्रसंचालन सागर येवले यांनी केले. विश्वास कुलकर्णी यांनी गौरवपत्राचे वाचन तर संजय काळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. छाया पाठक यांनी आभार मानले. यावेळी नेवे परिवारातील सदस्यांनी मनोगत व्यक्त केले.
फोटो ओळी – मधुकर नेवे व मालती नेवे यांचा सत्कार करतानाभरत अमळकर, अनिता कांकरिया, रत्नाकर पाटील.