- कुंदन पाटील जळगाव : ‘जी-२०’ परिषदेच्यानिमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक भेटले. सुनक म्हणाले, हाऊ इज ‘यूटी...’ मी म्हटलो ‘व्हाय...’ (‘यूटी’ म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे) त्यावर सुनक म्हणाले, ‘ते’ दरवर्षी लंडनला येतात आणि संपत्ती घेतात. थंड हवा खातात आणि भारतात परतात. तुम्ही ब्रिटनला या. तुम्हाला सगळं सांगतो, असेही सुनक यांनी सांगितले. त्यामुळे आमच्या भेटीवर टीका करणाऱ्यांनी जास्त बोलायला लावू नका. अन्यथा ‘पाटणकर काढा’ घेण्याची वेळ येईल, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केला. नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा त्यांनी हिशेब घेतला. पाचोरा येथील पहिल्या तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनक-शिंदे भेटीवर टीका केली होती. त्यावर शिंदे यांनी भाष्य केले. ‘पाटणकर काढा’ घेण्याची वेळ येऊ देऊ नका, हा इशारा देणाऱ्या शिंदेंनी ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.
आरक्षणासाठी हक्काला धक्का नाही : पवार अनेक जण नौटंकी करतात. भावनेला हात घालतात आणि गैरसमज पसरवितात. त्यामुळे मराठा आरक्षण देताना अन्य कुठल्याही घटकाला समाजाच्या हक्काला धक्का लागू देणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला.