शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

याला घेऊ नका, त्याला घेऊ नका करण्यापेक्षा स्वत:कडे पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:12 AM

लोकमत न्यूज जळगाव : पक्षात याला घेतले तर त्याला का घेतले, त्याला हे पद देऊ नका, ते पद देऊ ...

लोकमत न्यूज

जळगाव : पक्षात याला घेतले तर त्याला का घेतले, त्याला हे पद देऊ नका, ते पद देऊ नका, अशा वेगवेगळ्या कारणांवरून आपसाद मतभेद करीत माध्यमांना बातम्या पुरविण्यापेक्षा अगोदर स्वत:कडे पहा, अशा शब्दात कान उघडणी करीत आपसातील मतभेद विसरून कामाला लागा, असा सल्ला जळगाव लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख संजय सावंत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसंपर्क अभियान राबविण्यासंदर्भात आयोजित बैठकीत दिला. शिवसेना शहर व ग्रामीणचा रविवारी संध्याकाळी अजिंठा विश्रामगृहात मेळावा झाला.

एकनाथ शिंदे यांच्या स्वागत फलकावरून सुरुवात

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी लावलेल्या काही फलकांवर काही नेत्यांचे छायाचित्र नव्हते तर काही फलकांवर कोणाचे नाव नव्हते. त्यावरून मतभेद दिसून येत असल्याने हा पक्षाचा प्रोटोकॉल नसल्याचे सांगत गुलाबराव वाघ यांनी या मुद्यावर बोट ठेवले. नंतर त्यावर संजय सावंत व गुलाबराव पाटील यांनीदेखील कान उघडणी करीत पक्षाची शिस्त पाळा, कोणाला डावलून व कोणाचे नाव घेऊन तुम्ही तुमचीच मनोवृत्ती दाखवत असल्याची टीका केली.

....तर राजकारण सोडून देईल

पक्षाकडून आपल्याला पद भेटले पाहिजे, अशी सर्वांची अपेक्षा असते, मात्र त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आता जो आला तो पदाची लगेच अपेक्षा करतो, असे नाही चालत, असे सांगत पदासाठी नाही तर पक्षासाठी काम करा, असा सल्ला पालकमंत्र्यांनी दिला. इथपर्यंत मला यायला ३६ वर्षे लागली, आजही मी सामान्यांच्या कामासाठी पक्षासाठी झटतो. स्वत:च्या गाडीत बायकोला कोठे घेऊन फिरत असल्याचे कोणाला आढळून आले तर मी राजकारण सोडून देईल, असे सांगत स्वार्थापेक्षा पक्षासाठी काम करा, असे त्यांनी नमूद केले.

जे आम्हाला सोडताे त्यांना आडवा पडतो

आमदार चिमणराव पाटील व आपल्यामध्ये कोणतेच वाद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्याला पक्ष सोडायचा आहे तो सोडू शकतो, मात्र जो शिवसेनेला सोडून जातो, त्याला मात्र नंतर निवडणुकीत पाडतो, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणाशी वाद आहे तर येऊन चर्चा करा, तोडगा काढता येऊ शकतो, असेही पक्षातील खदखदविषयी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

आपल्यातीलच मला बदनाम करतात

पालकमंत्री व आमदारांमध्ये मतभेद असल्याचे पक्षातीलच मंडळी माध्यमांना सांगतात. आपल्यातीलच मंडळी मला बदनाम करीत असल्याचे पालकमंत्री म्हणाले. कोणाला घेण्यावरून वाद करण्यापेक्षा ज्याला घेतले त्याच्यातील कौशल्याचा विचारा करा, त्याच्या कौशल्याचा पक्षाला फायदाच होईल, हे महत्त्वाचे आहे. मी जुना आहे हे सोडा व सर्वांसोबत काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला. बीएचआर प्रकरणातही माझे नाव गोवण्याचा प्रयत्न झाला, मात्र माझ्याकडे त्यावेळी सहकार खाते होते, त्यावेेळी ते बुडालेल्या पतसंस्थांचे खाते, असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले.

आम्हालाही कारवाई करता येते पण वेळ आणू नका..

नवीन जिल्हा प्रमुख झाल्याची काही मतदार संघात अडचण आहे, मात्र जुळवून घ्या, असा सल्ला देत पक्षाचा प्रोटोकॉल पाळा, अन्यथा ज्या दिवशी सटकली त्या दिवशी तुम्ही पालकमंत्री कसा आहे, हे पहाल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. आम्ही आम्हालाही कारवाई करता येते, असादेखील इशारा देत ती वेळ आणू नका, असा सल्लादेखील त्यांनी दिला.

सच्चा शिवसैनिकाने एसटी जाळली शिवसैनिक पक्षाशी किती एकनिष्ट असावा, हे सांगताना पालकमंत्र्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाल्यानंतर धरणगाव येथे एका शिवसैनिकाने एसटी जाळली होती, असे सांगितले. मात्र आता मंत्री असताना असा सल्ला दिल्याने आता एसटी जाळा असे मी सांगणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तीन पाट लोकांची हकालपट्टी करा

रावेर लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख विलास पारकर व माझ्यात कोणतेही वाद नाही, असे संजय सावंत यांनी सांगितले. जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता येण्यासाठी पारकर यांनी प्रयत्न केले, याचा मला अभिमान आहे. तो माझा अपमान समजलो नाही. त्यानंतर एकाही नगरसेवकाला फोन करून विचारणा केली नाही. तरीदेखील माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. पक्षात अजूनपर्यंत असे घाणेरडे प्रकार झाले नाही, त्यामुळे पक्षाची शिस्त पाळण्याचे आवाहन करीत बदनामी करणाऱ्या तीनपाट लोकांची कशी हकालपट्टी करता येईल, हे पहा, अशा शब्दात आपला रोष व्यक्त केला.

सुरेशदादा जैन यांना विसरून चालणार नाही

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांचे मोठे मन म्हणून त्यांनी शिवसेनेला साथ दिली. आज महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांना विसरून चालणार नाही, असेही संजय सावंत यांनी यावेळी नमूद केले. सुरेशदादा जैन यांची जादू आजही कायम आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही नमूद केले.