ंआॅनलाईन लोकमत, जळगाव, दि.४- जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) ग्रामीण व लहान नागरी क्षेत्रातील सदस्यांच्या एकूण ३६ जागा रिक्त आहेत. मात्र निधीअभावी या जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जाहीर केला नव्हता. अखेर हा तिढा मिटला असून शासनाने डीपीडीसीच्या एका हेडखालीच या निवडणूक खर्चाची तरतूद केल्याने दोन दिवसांत हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. डीपीडीसीच्या ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातील २७ जागा रिक्त असून लहान नागरी निर्वाचन क्षेत्रातील ९ जागा अशा एकूण ३६ जागा रिक्त आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा प्रस्ताव डीपीडीसीकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. मात्र यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. जिल्हा प्रशासनाने डीपीडीसीकडे निवडणूक कार्यक्रम घेण्यासाठी निधीची मागणी केली. तर डीपीडीसीने त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली. त्यामुळे निधी प्राप्त होईपर्यंत निवडणूक कार्यक्रम लागणार नसल्याने तिढा निर्माण झाला होता. मात्र शासनाने याबाबतचा निधी डीपीडीसीच्या एका हेडखाली देण्याचा निर्णय घेतल्याने हा तिढा मिटला आहे.
डीपीडीसीच्या निवडणुकीसाठी निधीचा तिढा मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 11:28 AM
शासनाने केली तरतूद : दोन दिवसात निवडणूक कार्यक्र जाहीर होणार
ठळक मुद्देडीपीडीसीच्या एकूण ३६ जागा रिक्तग्रामीण निर्वाचन क्षेत्रातील २७ जागा रिक्त लहान नागरी निर्वाचन क्षेत्रातील ९ जागा रिक्तडीपीडीसीच्या एका हेडखाली निधीची तरतूद