जळगाव : डॉ. अंकिता दिलीप पाटील हीने डी.एम. (नेफ्रॉलॉजी) मध्ये प्रथम श्रेणीसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होत उत्तम यश प्राप्त केले. ती मुंबईच्या जी.एस. मेडीकल कॉलेज व केईएम हॉस्पीटलची विद्यार्थिनी आहे.डॉ. अंकिता ही जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील अंजाळे गावची मुळ रहिवासी असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांची पुतणी आहे. तिचे वडील डॉ. दिलीप पाटील बंगळूरच्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स येथे गणिताचे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. डॉ. अंकिताने एम.बी.बी.एस.चे शिक्षण कर्नाटकच्या जे.जे.एम. महाविद्यालयातून तर एम.डी. (मेडिसीन) चे शिक्षण मुंबईच्या जी.एस.वैद्यकीय महाविद्यालयातून केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.