जळगाव : रॅगिंगचा बळी ठरलेल्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी लोकशाहीवादी नागरीक मंच, मणियार बिरादरी, जननायक फाउंडेशन, महिला असोसिएशन व इतर संघटनांतर्फे शुक्रवारी सकाळी १० ते १२ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणातील संशयितांची नोंदणी रद्द करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या.डॉ. पायल तडवी या मूळच्या जळगावच्या असून त्यांच्या मृत्यूने जळगावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात येत असून यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणला होता.सायंकाळी ७ वाजता काव्यरत्नावली चौकात श्रद्धांजली सभा होणार आहे.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी दोषी डॉक्टरांची नोंदणी रद्द करा - विविध संघटनांकडून मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:50 PM