माकडांचा मुक्त संचार
जळगाव : उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने वन्य जीवांनी शहरांची वाट धरली आहे. अन्न व पाण्याच्या शोधात हे प्राणी शहरात येत असल्याचे चित्र आहे. अयोध्यानगरातही दुपारी दोन वाजेच्या सुमारा पाच ते सहा माकडे एका समुहातच आल्याने काहीसा गोंधळ उडाला होता. फोटो १३ सीटीआर ९१
रिपाइंची बैठक स्थगित
जळगाव: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली २७ रोजी जळगावात होणारी बैठक स्थगित करण्यात आली आहे. कोरानाचा वाढता संसर्ग यामुळे ही बैठक स्थगित करण्यात आल्याची माहिती महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण जयंती साजरी
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यालय अधीक्षक एम. आर. महाले, जी.एन. गवळी, संजय पाथरूड, आर. एन. धाकड, गोपाळ पोहरे आदी उपस्थित होते.