भुसावळ, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर काम करणाऱ्या डॉ.जगदीश पाटील यांचा सन्मान म्हणून पालिका माध्यमिक शिक्षण समितीने अभिनंदनाचा ठराव केला आहे. शिक्षण सभापती मंगला आवटे, माजी सभापती अॅड.बोधराज चौधरी, प्राथमिकचे माजी शिक्षण सभापती अॅड.तुषार पाटील व माजी सभापती राजेंद्र आवटे यांच्या उपस्थितीत डॉ.पाटील यांना अभिनंदन ठरावाची प्रत देण्यात आली. पालिकेच्या इतिहासात प्रथमच असा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला आहे.पालिका संचलित दयाराम शिवदास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असताना डॉ.जगदीश लक्ष्मण पाटील यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे येथील मराठी विषयासाठी अभ्यास मंडळ सदस्य म्हणून गुणवत्तेच्या आधारे निवड झाली होती. त्यांनी इयत्ता आठवी व दहावी पाठ्यपुस्तक निर्मितीत काम केले आहे. त्यांची ही निवड पालिका व शाळा यांच्यासाठी गौरवाची बाब असल्याने त्यांचा सन्मान म्हणून पालिकेच्या माध्यमिक शिक्षण समितीने थेट प्रोसिडींगवर ठराव घेत अभिनंदनाचा ठराव संमत केला आहे.
भुसावळात डॉ.जगदीश पाटील यांचा पालिकेकडून ठरावाद्वारे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 6:40 PM
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर काम करणाऱ्या डॉ.जगदीश पाटील यांचा सन्मान म्हणून पालिका माध्यमिक शिक्षण समितीने अभिनंदनाचा ठराव केला आहे.
ठळक मुद्देभुसावळ पालिकेच्या इतिहासात प्रथमच अभिनंदनाने शिक्षकाचा सन्मानराज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावर काम केल्याबद्दल कौतुक