आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जळगाव शाखेच्या सचिवपदाची डॉ.विलास भोळे यांनी तर अध्यक्षपदाची डॉ.किरण मुठे यांनी व उपाध्यक्ष पदाची डॉ.प्रदिप जोशी यांनी पदग्रहण सोहळ््यात सूत्रे स्वीकारली. या सोहळ््याच्या अध्यक्षस्थानी मेडिकल कौन्सीलचे सदस्य डॉ.प्रताप जाधव होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील उपस्थित होते.एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ठरल्याप्रमाणे डॉ.विश्वेश अग्रवाल यांनी अध्यक्षपदाचा तर डॉ. राजेश पाटील यांनी सचिवपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी या पदांवर अनुक्रमे डॉ.किरण मुठे व डॉ.विलास भोळे यांची निवड करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा पहग्रहण सोहळा शनिवारी औद्योगिक वसाहत परिसरातील एका हॉटेलमध्ये झाला.नुतन पदाधिकारी व मावळत्या अध्यक्ष, सचिवांचा सत्कार करण्यात आला. डॉ.राजेश पाटील यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून वर्षभराचा कार्य अहवाल सादर केला. डॉ.विश्वेश अग्रवाल, डॉ.किरण मुठे, डॉ.विलास भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप डॉ.प्रताप जाधव यांनी केला. परिचय डॉ.अनुप येवले व तुषार बेंडाळे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन डॉ.दर्शना शहा यांनी केले.
जळगाव आयएमएच्या अध्यक्षपदी डॉ.किरण मुठे, डॉ.विलास भोळे सचिवपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:39 PM