जळगाव : रॅगिंगचा बळी ठरलेल्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात डॉ. पायलच्या आई-वडिल व लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.दरम्यान जळगावातही पायलच्या दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.डॉ पायल तडवी हिने २२ रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ.हेमा आहुजा व डॉ.भक्ती मेहेर यांना अटक झाली आहे.‘वर्षा’वर २५ मिनिटे चर्चालोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, पायलचे आई व वडील यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. सुमारे २५ मिनिटे या प्रकरणावर चर्चा झाली. डॉ पायल यांच्या आईनेही सर्व तपशील सांगून माझ्या मुलीला न्याय द्या म्हणून आपले दु:ख मांडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत प्रशासन तुमच्या मागे खंभीरपणे उभे असून न्याय देण्याचे आश्वासन देत असतानाच या घटनेचा तपास हा गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रँच) सोपवून सरकारतर्फे चांगला वकील नेमण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यावेळी छावा संघटनेच्या वंदना पाटील व सरिता माळी उपस्थित होत्या.
डॉ.पायल तडवीच्या आईवडिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:37 PM