शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.सुधाकर कु-हाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:41 PM

3 व 4 फेब्रुवारी रोजी बारीपाडा येथे संमेलन

ठळक मुद्देचैत्राम पवार स्वागताध्यक्ष, अभय उजागरे निमंत्रकविविध विषयावर चर्चा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 - बारीपाडा येथे 3 व 4 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय पक्षी मित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पक्षी अभ्यासक आणि संशोधक डॉ. सुधाकर कु-हाडे यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनासाठी संचालन समितीही गठीत करण्यात आली आहे. बारीपाडय़ाचा कायापालट करणारे चैत्राम पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून अभय उजागरे निमंत्रक तर सहनिमंत्रक अनिल महाजन आहेत. इतर पदाधिकारी या प्रमाणे -  समन्वयक - अमन गुजर, संयोजक- राजेंद्र नन्नवरे, सहसंयोजक- इम्रान तडवी, अनिल माळी (नाशिक).  संमेलन संचालन समितीमध्ये प्रा. पी. एम, व्यवहारे, राहुल सोनवणे, बाळकृष्ण देवरे, अर्चना उजागरे, आणि विक्रम पाटील यांचा समावेश आहे.

विविध विषयावर चर्चानागरी आणि शहरी भागातील पक्षी संवर्धन,  पाणवठय़ावरील पक्षी संवर्धन, वनक्षेत्रातील पक्षी संवर्धन, पक्षी अधिवास संकट,  पक्षी अभियान चळवळ आणि संस्था बांधणी या विषयांवर र्सवकष चर्चा होणार आहे तसेच अनेक महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात येऊन उत्तर महाराष्ट्रातील पक्षीसवर्धन चळवळीची दिशा ठरवली जाणार आहे. संमेलनाच्या संयोजन संस्था पुढील प्रमाणे - पर्यावरण शाळा, डीएनए-धुळे, न्यू कॉन्झरवर, वन्यजीव संवरक्षण  संस्था, अग्निपंख , उडान,उपज,  चातक नेचर कॉन्झरवेशन सोसायटी आणि बारीपडा ग्राम पंचायत इत्यादी. 

डॉ. सुधाकर कु-हाडे नगर जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षकडॉ. सुधाकर कु-हाडे शेवगाव ( जि. नगर) येथील कला, विज्ञान महाविद्यालयात प्राणिशास्त्राचे प्राध्यापक असून अहमदनगरच्या निसर्ग मित्र मंडळाचे संस्थापक आहेत, आणि नगर जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षक म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. जळगाव येथे  झालेल्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले आहे. डॉ. कु:हाडे पक्षी संवर्धनाबरोबरच संशोधन करीत असतात. त्यांनी 5 लघु संशोधन प्रकल्प आनंद 62 शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकामधून प्रसिद्ध झाले आहेत.