शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

डॉ.उल्हास पाटील एनएबीएल लॅबकडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:15 AM

जळगाव : भुसावळ, मुक्‍ताईनगर, यावल, रावेर, बोदवड क्षेत्रातील नागरिकांना आता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील एनएबीएल मानांकित ...

जळगाव : भुसावळ, मुक्‍ताईनगर, यावल, रावेर, बोदवड क्षेत्रातील नागरिकांना आता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील एनएबीएल मानांकित लॅबमधून शासनाच्या आदेशानुसार आरटीपीसीआर टेस्ट करता येणार आहे. अवघ्या २४ तासात रिपोर्ट देण्यात येणार आहे. यासंदर्भात आरटीपीसीआर नमुना तपासणीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलला पत्र दिले आहे. येथे अद्यावत एनएबीएल मानांकित मॉलेक्युलर डायग्नोस्टीक लॅबोरेटरी प्रस्थापित करण्यात आली आहे. सद्यस्थीतीला दर दिवसाला ३५० ते ४०० कोविड स्वॅब तपासले जात असून खात्रीशीर रिपोर्ट दिला जात आहे.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मार्गदर्शन

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स ग्रॅज्युएट्ससाठी ‘करियर पर्याय व उपलब्ध संधी’ या विषयावर १९ एप्रिल रोजी ऑनलाईन पद्धतीने एक दिवसीय संवादाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्राचार्य डॉ.विजय पाटील, उपप्राचार्य प्रा.प्रवीण फालक यांनी केले. अ‍ॅकेडमिक डीन व ई अ‍ॅण्ड टीसी विभागप्रमुख प्रा.हेमंत इंगळे यांनी भाषण केले. मार्गदर्शक प्रमुख फिलीप्स इंडिया लिमिटेड, पुणे येथील तज्ज्ञ संवादक रेंजिथ सी.व्ही. ह्यांची उपस्थीती होती. समन्वयक प्रा.विजय चौधरी यांनी ओळख करुन दिली.

रेंजिथ सी.व्ही यांनी इलेक्ट्रॉनिक्स, संगणक व विद्युत अभियांत्रिकी सहभागार्थींना करिअर नियोजन, उच्च शिक्षण (भारत व परदेशात) उपलब्ध संधी, इलेक्ट्रॉनिक्स संबंधित संशोधन व उद्योग (स्टार्ट अप) यासाठी हार्डवेअर व सॉफ्टवेअरमध्ये लागणारे विविधअंगी कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

निर्बंध काळातही बाफना ज्वेलर्सची दागिने बुकिंग योजना

जळगाव : रतनलाल सी बाफना ज्वेलर्सने गुढीपाडव्याला सुरु केलेली ऑनलाईन सोने बुकिंगची योजना सुरू असून कोविडच्या निर्बंध काळातही दागिने खरेदीसाठी एक स्पेशल ऑफर ग्राहकांना देऊ केली आहे. सदर ऑफर मध्येही ग्राहक आपल्या पसंतीचे दागिने आजच्या दराने ७५ टक्के रक्कम जमा करून ऑनलाईन बुक करू शकतात. डिलिव्हरी घेतेवेळी सोन्याचे दर घसरल्यास ग्राहक कमी झालेल्या दराने आणि सोने दर वाढल्यास बुकिंग केलेल्या दराने आपले सुवर्ण अलंकार खरेदी करू शकतात. सदर योजना २२ कॅरेट हाॅलमार्क दागिन्यांसाठी असून दागिन्यांची डिलीव्हरी ग्राहकांनी ३१ मे पर्यंत नेणे बंधनकारक आहे. या योजनेसोबतच २२ कॅरेट दागिन्यांच्या घडणावळीवर १५ टक्के सूट मिळणार आहे. योजना २२ एप्रिलपासून सुरू झाली असून बुकिंगसाठी रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे.

दर्जीतर्फे पुस्तकाचे पूजन करून पुस्तक दिन साजरा

जळगाव : दर्जी फाउंडेशनतर्फे प्रातिनिधीक पुस्तकाचे पूजन करून पुस्तक दिन साजरा करण्यात आला. २३ एप्रिल या दिवसाचे औचित्य साधून दर्जी फाउंडेशन ऍप्स्वर विद्यार्थी व वाचकांच्या पसंतीचे पुस्तके निःशुल्क वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी फाउंडेशनचे ऍप्स् इंन्स्टॉल करावे व इतरांना सुध्दा सांगावे व त्यावरील पुस्तक वाचनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रा.गोपाल दर्जी यांनी केले. संचालिका ज्योती दर्जी, उमेश पाटील, विजय कोजगे, चेतन कांडेलकर यांचे सहकार्य लाभले.

पुण्याचे आयुर्वेदाचार्य वैद्य प्रवीण पाटील उद्या जळगावात

जळगाव : पुण्याचे आयुर्वेदाचार्य तथा नाडी तज्ज्ञ वैद्य प्रवीण पाटील हे आपल्या श्री विश्व आयुर्वेदामृत या आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्र पुणे अंतर्गत जळगाव येथील शाखेत ढाके कॉलनीतील डॉ. उभाड पाटील मुलांचे व डोळ्यांचे हॉस्पिटल येथे दर महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या रविवारी येत असतात. २५ एप्रिल रोजी ते सेवा देणार आहेत. नाडी परिक्षणाने परिपूर्ण अशा आयुर्वेदीय चिकित्सेने असंख्य रुणांना त्यांनी पूर्णपणे बरे केले आहे. काहींच्या शस्त्रक्रियाही वाचल्या आहेत. इच्छुकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.