अमळनेर : स्वप्न इतकी मोठी बघा की लोकांनी वेडे म्हणून हसले पाहिजे. कारण ध्येयवेडी लोकच इतिहास घडवितात, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी तालुक्यातील मंगरूळ येथील मुलींच्या मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले.मंगरूळ येथील स्व.अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ.अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे नामकरण आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्र उदघाटनप्रसंगी माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपप्राचार्य डॉ.एस.ओ.माळी, ग.स.बँकेचे माजी चेअरमन झाम्बर पाटील, नौदलाचे चे ग्रुप कॅप्टन अविनाश पाटील, ॲड.सूर्यवंशी, संस्थाचालक जयवंतराव पाटील, रवींद्र पाटील, संस्थेच्या संस्थापक सुहासिनी पाटील, चेअरमन श्रीकांत पाटील प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.यावेळी अभ्यासिकेस आय.जी.प्रतापराव दिघावकर यांच्यातर्फे एक लाखाची पुस्तके आणि चार संगणक देण्यात आले.ते पुढे म्हणाले की, मी अवघ्या १२०० रुपयात आयजी झालो आहे. सर्व प्रकारची पुस्तके याठिकाणी उपलब्ध असून तलाठी, पोलीसपासून उच्च अधिकारीपर्यंत कोणत्याही परीक्षेसाठी सुविधा उपलब्ध आहेत, त्याचा मुलींनी लाभ घ्यावा. चेअरमन श्रीकांत पाटील यांनी परिसरातील जास्तीत विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. मी सर्वोतोपरी मदतीसाठी तयार आहे, असे आश्वासनही दिले.माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील म्हणाले की, सर्वसामान्य शेतकरी, गरीब विद्यार्थी, मुलींची जाण ठेवून त्यांची प्रगती करण्याचे उत्कृष्ट कार्य एक वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहे हे निश्चित गौरवस्पद आहे. स्मिता वाघ म्हणाल्या की, ग्रामीण भागातील मुलींसाठी त्यांच्या उच्चाटनासाठी दिघावकर यांनी घेतलेला ध्यास वाखाणण्याजोगा आहे.अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रगती काळे, नंदिनी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी योगेश पाटील, शिक्षक व्ही.ए.पवार यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.कार्यक्रमास उपसरपंच संजय पाटील, हिरालाल पाटील, रामकृष्ण वाणी, किशोर पाटील, विश्वास पाटील, धनराज पाटील, प्रफुल पाटील, वाल्मीक पाटील, संदीप पाटील, चंद्रशेखर पाटील, श्रुती पाटील, सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील विद्यार्थी व मंगरूळ ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वप्नं इतकी मोठी बघा की लोक वेडे म्हणून हसतील-आय.जी. दिघावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 2:13 PM