शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

बसची बैलगाडीला मागून धडक चालक व बैलजोडी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 3:53 PM

बसचालक पसार: पातोंडा-नांद्री गावाजवळचा अपघात

पातोंडा, ता. अमळनेर: चालत्या बैलगाडीला मागून येणाऱ्या एस.टी. बसने जोरदार धडक दिल्याने बैलगाडी मालक अनिल गंगाराम पाटील यांच्या डोक्याला व कमरेला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले. तसेच बैलगाडी चे दोन्ही बैलही गंभीर जखमी झाले असून बैलगाडीचे नुकसान झाले आहे. हा अपघात ५ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास झाला. पातोंडा-नांद्री गावाजवळ घडला.या घटनेबाबत वृत्त असे की, पातोंडा येथील शेतकरी तथा विकास सोसायटीचे संचालक अनिल गंगाराम पाटील हे सकाळी आपल्या शेतातून बैलगाडीने चारा घेऊन घरी परत येत होते. त्याचवेळी रस्त्यात मागून अमळनेरहून नांदेड ता. धरणगाव येथे जाणाऱ्या अमळनेर आगाराच्या अमळनेर- नांदेड (बस क्र. एम. एच.२० डी.८९०८) या भरधाव बसने बैलगाडीला मागून जोरदार धडक दिली. त्यात बैलगाडीची दुसेर मोडली जाऊन एक बैल रस्त्याच्या कडेला तर दुसरा बैल बैलगाडीसह दोन फरलांगच्या अंतरावर फरफटत जाऊन पडला. बैलगाडी हाकलणारे बैलजोडी मालक अनिल गंगाराम पाटील हे जोरदार फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी बस चालक सुनिल भिमराव पाटील घटना स्थळावरून लागलीच पसार झाले. वाहक मात्र े थांबून होते. घटनास्थळी ग्रामस्थांनी मदत करण्यासाठी व बघण्यासाठी गर्दी केली. जखमी अनिल पाटील यांना तत्काळ अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर घटनास्थळीच जखमी दोन्ही बैलांवर उपचार करण्यात आले. यात बसचे किरकोळ नुकसान होऊन. पुढील पत्राचा भागाला होल पडून काचही फुटला आहे.सदर अपघाताची फिर्याद सुनिल गंगाराम पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला दिली असून बस चालक सुनिल भिमराव पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पातोंडा पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात