ऑनलाईन लोकमत
जामनेर,दि.12 - जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील सुनसगाव फाटय़ाजवळ नादुरुस्त चारचाकीची दुरुस्ती करणा:या चालकास बंदूकीचा धाक दाखवित त्याच्याकडून 4 हजार रुपये रोख व मोबाईल लुटून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी संशयित भूषण उर्फ जिगर रमेश बोंडरे (रा.उमाळा, ता.जळगाव) याला ताब्यात घेतले आहे.
सुनसगाव फाटय़ाजवळ सोमवारी रात्री नादुरुस्त ट्रकची एक चालक दुरुस्ती करीत होता.या दरम्यान अज्ञात आरोपीने बंदूकीचा धाक दाखवित त्याच्याकडील चार हजार रुपये व मोबाईल लुटून नेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नजीर शेख, उपनिरीक्षक विकास पाटील, पाचोरा विभागाचे उपअधीक्षक केशव पातोंड व म्हसावद दूरक्षेत्रच्या कर्मचा:यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी रात्रीच नाकाबंदी करीत संशयितांचा शोध सुरु केला. मंगळवारी सकाळी पोलिसांनी जळगाव विमानतळाजवळून संशयित भूषण उर्फ जिगर रमेश बोंडरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस त्याच्या दुस:या साथीदाराचा शोध घेत आहेत. भूषण हा गेल्या दोन महिन्यांपासून म्हसावद येथे भाडय़ाची खोली घेऊन राहत आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.