राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सारवे गावाजवळ सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जळगावकडून धुळ्याकडे जाणारी केमिकल टँकर (एमएच४८/बीएम७४८०) व समोरून येणारी (जीजे३२टी ८९५६) हिने केमिकल टॅंकरला जोरदार धडक दिली. त्यात टँकरचालक किरकोळ स्वरूपाच्या जखमी झाला व जोरदार धडकेने टँकरचा डिझेल टॅंक फुटले असल्याने रस्त्यावर डिझेल पडले होते.
यावेळी पारोळा पोलीस दल व अग्निशामक विभागाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात सर्वत्र डिझेलचा असल्याने रहदारीस अडथळा येत होता. अशा वेळी पोलीस कॉन्स्टेबल सुनील वानखेडे, विजय भोई आदींनी व अग्निशमन दलाचे मनोज पाटील यांनी पाण्याच्या साहाय्याने रस्त्यावरील सांडलेले डिझेल बाजूला केले. त्यानंतर, रहदारी मोकळी करण्यात आली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येणार होता.
===Photopath===
290521\29jal_16_29052021_12.jpg
===Caption===
(छाया : राकेश शिंदे)