शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

थेंब-थेंब पाण्याने माळरानावर जगवली वृक्षस्नेही परिवाराने झाडे

By admin | Published: April 24, 2017 11:59 AM

वृक्ष स्नेही परिवाराने अमळनेरच्या पश्चिमेकडील एका टेकडीवर तब्बल 130 झाडी जगवली आहे.

अमळनेर,दि. 24 - खडकाळ, माळरान, पाण्याची कमतरता, चढायला रस्ता नाही, अशा परिस्थितीत थेंब-थेंब पाणी टाकून वृक्ष स्नेही परिवाराने अमळनेरच्या पश्चिमेकडील एका टेकडीवर तब्बल 130 झाडी जगवली आहे. तर 350 खड्डे खोदून ते लागवडीसाठी तयार केले आहेत. शहराच्या पश्चिमेला तीन ते चार किलोमीटर अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामागे खडकाळ उंचसखल भाग आहे. याठिकाणी चढायला जागा नव्हती. त्यावेळी वृक्षस्नेही मित्र परिवाराचे डॉ. चंद्रकांत पाटील, संदीप पाटील, कमलेश भावसार, पंडीत नाईक यांनी जेसीबी मशीनने रस्ता बनवला. त्यानंतर तेथे झाडे लावण्यासाठी 500 खड्डे खोदले. सर्व खडय़ात माती टाकून जून 2016 मध्ये 150 झाडी लावली. सुरवातील टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या खदानीत साचलेले पाणी वरती नेऊन, त्यांनी झाडांना टाकले. मात्र हळूहळू ते पाणी आटले. म्हणून लोकसहभागातून टेकडीवर कुंड बांधले. नगरपालिकेला विनंती करून, दररोज पाण्याचे टॅँकर त्यात ओतले जाते. कुंडय़ांनी बादल्यांनी 15 ते 20 लिटर पाणी झाडांना दिले जात होते. मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची काटकसर करणे गरजेचे आहे, तसेच झाडांचे संरक्षणही तेवढेच महत्वाचे म्हणून पिंज:यांना जुन्या साडय़ांचे आवरण लावले. झाडांच्या मुळाजवळील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून जमीनीवर ऊसाच्या पानांचा थर अंथरला. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या मागवून त्याला तळाशी छिद्रे पाडून त्या भरून थेंब-थेंब पाणी टाकून झाडे जगवली. 150 पैकी 130 झाडे टवटवीत आहेत. डॉ. दिनेश पाटील, हेमंत पाटील, अमोलसिंग राजपूत, अशोक सोनवणे, यांनीही परिश्रम घेतले. याठिकाणी वड,चिंच, जांभूळ, औदुंबर, कडुनिंब, कवट आदी झाडे लावण्यात आलेली आहे.