प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : शाकाहारी नसलेल्या लोकांचे सर्वात आवडते खाद्य म्हणजे मासे. आरोग्य वर्धक, चविष्ठ मासे सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. मात्र जिल्ह्यातील लहान मोठी जवळपास १२३ धरणे ओव्हरफ्लो असल्याने यंदा मासेमारीसाठी सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या वर्षी जवळपास ९९ टक्के धरणे कोरडी पडल्याने यंदा मासे तयार व्हायला वेळ लागणार आहे, असेही जाणकारांनी सांगितले आहे.जिल्ह्यात ५०० हेक्टरवरील ११८ धरणे आहेत. त्यातील खर्दे, ता.धरणगाव व सिंगारखेडा, ता.भुसावळ ही दोन धरणे नादुरुस्त आहेत, तर ११६ धरणांचे पाण्याखालील क्षेत्रफळ जवळपास ७,१३५ हेक्टर इतके आहे. ५०० ते १००० हेक्टरवरील तीन धरणे आहेत. त्यात बोरी, अंजनी व हिवरा धरणांचा समावेश आहे. त्यांचे क्षेत्रफळ १८०९ हेक्टर आहे, तर १००० हेक्टरवरील दोन मोठी धरणे आहेत. हतनूर व वाघूर यांचे पाण्याखालील क्षेत्रफळ ७,४७२ हेक्टर एवढे मोठे क्षेत्र पाण्याखाली येते. जिल्ह्यातील धरणांनी १६,४१६ हेक्टर असे मोठेच क्षेत्र काबीज केले आहे.मासेमारीसाठी ११८ धरणांना जिल्हा स्तरावर परवानगी देण्यात येते. ५०० हेक्टरवरील धरणांसाठी प्रादेशिक स्तरावर तर १००० हेक्टरवरील धरणांसाठी आयुक्तांकडून परवानगी देण्यात येते. ५०० हेक्टरच्या आतील धरणांना मासेमारीसाठी अधिकृत संस्थांना विनामूल्य परवानगी देण्यात येते. जवळपास अशा १०४ संस्था जिल्ह्यात आहेत.आपल्या जिल्ह्यात पंकज, कतला, कोंबडा, लालपरी, रोहू अशा प्रकारचे मासे मुख्यत्वे सापतात. काही प्रमाणात झिंगेदेखील सापडतात, पण त्यांची मागणी मोठ्या शहरात जास्त असल्याने बाहेर पाठवले जातात. त्यांना भावपण चांगला मिळतो.गेल्या वर्षी भयानक पाणीटंचाई असल्याने मोठी दोन धरणे सोडली तर सर्वच धरणे कोरडी पडली होती. यंदा अतिवृष्टीमुळे सर्वच धरणे ओसंडून वाहू लागल्याने मासेमारीसाठी मोठा व्यवसाय निर्माण झाला आहे. एकट्या वाघूर धरणात २०० मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. परंतु मासे एक किलो किंवा दीड किलो वजनाचे होण्यासाठी अजून बराच काळ लागणार असल्यानेश जिल्ह्यातील ताजे मासे खाण्यासाठी खवय्यांना वाट पहावी लागणार आहे.दक्षिणेकडील आंध्र प्रदेशात माश्यांचे मोठे उत्पादन होत असल्याने त्या राज्यातील मासे संपूर्ण देशभरात विकले जातात. आपल्या जिल्ह्यातदेखील या माश्यांची मोठी विक्री होते. एक व्यापारी चार ते पाच टन मासे आंध्र प्रदेशातून आयात करतो. असे मासे आयात करणारे अनेक मोठे व्यापारी आहेत. आंध्रात माश्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने तेथील माश्यांंची किंमतदेखील जिल्ह्यातील जिवंत ताज्या माश्यापेक्षा कमी असल्याने किरकोळ मासे विकणाऱ्यांची पसंती आंध्रच्याच माश्यांना जास्त आहे.पाच वर्षांसाठी मत्स्य उत्पादक संस्थेला जळगाव कायार्यालयातून परवानगी देण्यात येते. ही परवानगी विनामूल्य असते.-अतुल पाटील, एफ. डी. ओ., मत्सविभाग, जळगाव२०१६ सालापासून मत्सविभाग अनुदान देत नाही. जिल्ह्यातील धरणांतील मासे ताजे असतात. आंध्रातील मासे जिल्ह्यात पोहचायला १७ दिवस लागतात. पण ते ९० रु.किलो मिळतात म्हणून किरकोळ विक्रेते हेच मासे खरेदीला प्राधान्य देतात. आम्ही ११० रु. किलोने व्यापाºयांना विकतो.-मनोज वाणी, वाघूर धरणाचे ठेकेदारआंध्रातून जरी मासे येत असले तरी त्यांची पॅकिंग शास्रोक्त पध्दतीने केलेली असते. त्यामुळे ते सुरक्षित असतात. पश्चिम बंगालपर्यंत या माश्यांची मागणी आहे.-इक्बाल मन्सुरी, मासे डिलर, जळगाव
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दुष्काळी परिस्थिती, मात्र धरणे तुडुंब असल्याने मासेमारीसाठी सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 5:42 PM
जिल्ह्यातील लहान मोठी जवळपास १२३ धरणे ओव्हरफ्लो असल्याने यंदा मासेमारीसाठी सुगीचे दिवस आले आहेत.
ठळक मुद्देसर्वच धरणे ओसंडून वाहू लागल्याने मासेमारीसाठी मोठा व्यवसायमासेमारीसाठी ११८ धरणांना जिल्हा स्तरावर परवानगी५०० हेक्टरच्या आतील धरणांना मासेमारीसाठी अधिकृत संस्थांना विनामूल्य परवानगीजिल्ह्यात मुख्यत्वे सापडतात पंकज, कतला, कोंबडा, लालपरी, रोहू अशा प्रकारचे मासेकिरकोळ मासे विकणाऱ्यांची पसंती आंध्रच्या माश्यांना