धानोरा, ता.चोपडा (जि.जळगाव) : यावर्षी उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवल्यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. त्यामुळे पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी भविष्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम राबविण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या यावर्षी पाण्याची पातळी खालावल्याने केळी बागांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरच मोडले आहे, यावर मात करण्यासाठी गावातील तरूण अनंत बाजीराव पाटील, संदीप युवराज महाजन, प्रसन्न सतीश महाजन, विवेकानंद नारायण महाजन यांनी जेसीबीने नाला खोलीकरण व जलसंधारण करण्याची मोहीम हाती घेतल्याने संपूर्ण गावकºयांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या जोमाने कामाला सुरुवात झाली आहे.धानोरा येथे नाला खोलीकरण करण्यास तरुणांनी पुढाकार घेत ९ रोजी गवळी नाल्यात नाला खोलीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे.१० बाय एक मीटर व खोली एक मीटर लांबीचे खड्डे नाल्यात खोदले जात आहेत. ठिकठिकाणी नाल्यात अशी खड्डे केल्यास पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी त्यात साठवले जाईल आणि त्याचा फार मोठा फायदा भविष्यात भूजलपातळीत वाढ होणार असल्याने उत्साहाने काम सुरू आहे. गवळी नाल्यानंतर गावातील पालक नाल्याजवळ खोलीकरण व जलसंधारण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या कार्यासाठी गावातील ग्रामस्थ पुढे येत असून देणगी स्वरूपात अथवा स्वत:चे ट्रॅक्टर देऊन नाल्यात नांगरटी करून देत आहेत जेणे करून या पाण्याचा निचरा होऊन भविष्यात मोठा फायदा होईल, म्हणून तरुण वर्गदेखील या कार्यासाठी मोठ्या उत्साहाने काम करत आहे.
धानोरा येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:11 AM
धानोरा, ता.चोपडा (जि.जळगाव) : यावर्षी उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवल्यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. त्यामुळे पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी भविष्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम राबविण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या यावर्षी पाण्याची पातळी खालावल्याने केळी बागांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरच मोडले ...
ठळक मुद्देभविष्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम राबविण्याची संकल्पना१० बाय एक मीटर व खोली एक मीटर लांबीचे खड्डे नाल्यात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग