आडगांव ता.चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील मन्याड परिसरात अत्यंत दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने हा संपूर्ण परिसर दुष्काळी म्हणून जाहिर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या परिसरात सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने पावसाळा असून देखील नसल्यासारखी अवस्था झाली आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असून शेतकºयांनी पाहिलेल्या स्वप्नांवर पाणी फिरल्याने शासनाने हा संपूर्ण परीसर दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी होत आहे.गणपती बाप्पा पावणार का?सुरवातीपासूनच पावसाने या परिसरात पाठ फिरविल्याने रोज शेतकरी या नक्षत्रात पाणी येईल, त्या नक्षत्रात पाणी येईल असे रेडीओ , टि.व्ही वरती हवामानाचा अंदाज ऐकून आपल्या शेतातील पिकांचे नियोजन करू लागला होता.तथापि पावसाळा संपून तीन महिने झाले तरी तिनवेळा सुध्दा परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने खरीपात लागवड केलेल्या मका, कपाशी, ज्वारी, बाजरी, तुर, भुईमूग या सर्व पिकांची पूर्ण वाट लागल्याने निदान गुरांचा चारा, पाणीसाठी तरी गणपती बाप्पा पावणार का? असा प्रश्न परिसरातील शेतकºयांना पडला आहे.खरीप गेला, रब्बीची नाही आशामन्याड परिसरात खरीप हंगाम डोळ्यादेखत वाया गेल्याचे पाहून हताश मनाने आता सर्व गेले म्हणून नशीबाला शेतकरी दोष देत आहे. एवढेच नव्हे तर नदी, नाले, विहिरी, बंधारे संपूर्ण कोरडेठाक असल्याने खरीपच गेला वाया आता रब्बीची नाही आशा असे म्हणण्याची वेळ परीसरातील शेतकºयांवर आली आहे.पाणी व चाºयाचा प्रश्न गंभीर बनणारपरतीचा पाऊस फिरकलाच नाही तर पाणी व चाºयाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार ही वस्तुस्थिती कुणीही नाकारून चालणार नाही. त्यासाठी प्रशासनाने आतापासूनच गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
मन्याड परिसरात दुष्काळाचे चटके तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:40 AM
चाळीसगाव तालुक्यातील मन्याड आणि परिसरात पावसाअभावी दुष्काळाची तिव्रता वाढली असून खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. तसेच भविष्यातील चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.
ठळक मुद्देनदी, नाले, विहिरी, बंधारे संपूर्ण कोरडेठाक प्रशासनाने आतापासूनच गांभिर्याने लक्ष देण्याची गरज