जळगाव : भाजपच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी डॉ. संजीव पाटील यांची आज शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश महाजन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.लोकसभा निवडणूक काळापासून भाजपात जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू होत्या. त्यानुसार गुरूवारी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी मुंबईत जाऊन जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज मुंबईत पक्षाच्या जिल्ह्यातील आमदार, खासदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती.प्रदेशाध्यक्षांनी केली नियुक्तीजिल्हाध्यक्षपदासाठी दोन नावे चर्चेत होती. यात जि.प.सभापती पोपट भोळे व डॉ. संजीव पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र डॉ. संजीव पाटील यांच्या नावावर प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब झाले.भोळे, सुर्यवंशी यांच्यावर जबाबदारीआगामी काळात विधानसभेची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर बुथ सदस्य नोंदणी अभियान राबविण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. सदस्य अभियान प्रमुख म्हणून ग्रामीण भागाची जबाबदारी जि.प. सभापती पोपट भोळे यांच्यावर तर जळगाव महानगर पदाची जबाबदारी नगरसेवक दीपक सुर्यवंशी यांच्यावर सोपविण्यात आली. बैठकीस खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदुलाल पटेल, विभाग संघटनमंत्री किशोर काळकर आदी उपस्थित होते.खडसे, वाघ अनुपस्थितबैठकीस माजी मंत्री एकनाथराव खडसे तसेच उदय वाघे हे दोघेही नव्हते. याबाबत चर्चा होती.कोण आहेत डॉ. संजीव पाटीलडॉ. संजीव पाटील हे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत. जिल्हा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष, जि.प. उपाध्यक्ष, प्रभारी जि.प.अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी भुषविली आहे. ते मुळचे भडगाव तालुक्यातील आचळगाव येथील रहिवासी असून एम.एस. सर्जन आहेत. चाळीसगाव व पाचोरा येथे ते वैद्यकीय व्यवसाय करतात.
भाजप प्रभारी जिल्हाध्यक्षपदी डॉ. संजीव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 8:31 PM