कुंदन पाटील / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21 - अक्षरांना आबदार आणि रूबाबदार साज चढविणा:या चोपडय़ातील कलाशिक्षकाचा वारसा दुस:या पिढीनेही तेवत ठेवला आहे. नागपुरे भावंडांच्या कलाकृतीने भरविलेल्या अक्षरयात्रेला दुबईतील ह्यउद्योग इंडियात स्थान मिळाले आहे. मराठमोळ्या अक्षरांचे व:हाड उद्या दुबईवारीवर निघणार आहे.आनंदा बंडू नागपुरे यांचा हा वारसा. चोपडा येथील प्रताप विद्यालयात कलाशिक्षक म्हणून सेवेत असताना आनंदा नागपुरे यांनी अक्षरांचा साज चढविला.अक्षरेही आनंदाने ताल धरु लागली. सेवेत असतानाच नागपुरेंचे निधन झाले आणि अक्षरांची जत्रा अंधारमय झाली. वसंत आणि पंकज नागपुरे या दोन्ही सुपुत्रांच्या रक्तातही कला भिनली आणि अंधारमय बनलेली अक्षरजत्रा पुन्हा आनंदली. या दोन्ही भावंडांनी अक्षरांशी प्रेम कायम ठेवत वडिलांचा वसा आणि वारसा आनंदाने जपला.त्याचीच फलश्रुती म्हणून नागपुरे बंधूंच्या अक्षरांची कलाकृती आता दुबईत भरणा:या उद्योग इंडिया या प्रदर्शनात मांडली जाणार आहे. जन्मजात वारसाआनंदा नागपुरे हे मूळचे चोपड्यातील. कलाशिक्षक म्हणून सेवारत असताना त्यांना हृदयविकाराने हेरले आणि त्यांचे निधन झाले.अक्षरलेखन, पेंटिंग, साईन बोर्ड आणि बॅनर साकारण्यात ते माहीर होते.त्यांच्या निधनानंतर बारावीत शिकणा:या पंकज यांनी वडिलांच्या कलाकृतीला आधार द्यायला सुरुवात केली. वसंतरावही सोबतीला होतेच. मग नागपुरेंच्या घरात अक्षरयात्रा आनंदाने नांदायला लागली.अक्षरांच्या दालनात भावंड सक्रिय वसंत नागपुरे हे घोडगावच्या निकुंभ विद्यालयात कलाशिक्षक.त्यांची अक्षरयात्रा याआधी विविध प्रदर्शनात अनेकदा मांडली गेली. ह्यकॅलिग्राफीने अक्षरांना कलाकृतीचा सुवर्णस्पर्श देण्यात वसंतराव तसे तरबेजच.प्रेमात पाडणा:या चित्रकलेमुळे वसंतरावांची अनेक मान्यवरांकडून वाहवा झाली.अक्षरांच्या वळणांवरही त्यांचे कौतुक झाले. पुरस्कारही मिळाले. अनेक ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण शिबिरेही घेतली.पंकज नागपुरे हे लहान बंधू.वाद्यसंस्कृतीत रमणारा कलावंत.फोटोग्राफी हा त्यांचा छंद. अक्षरांना जपणारे पंकज हे चोपड्यातील प्रताप विद्यालयात कलाशिक्षक.त्यांनीही अनेकदा त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविले.ह्यआनंद अक्षरच्या पितृछत्राखाली ह्यकॅलिग्राफीला जीवंतपणा आणला.राष्ट्रीय पातळीवर त्यांना पुरस्कार देऊन गौरविले गेले. कलेने भिजलेले पंकज ह्यजाणता राजाच्या महानाट्यातही रंगमंचावर पोहचले.लिखाणात सुरेखता यावी म्हणून त्यांनी विद्याथ्र्यांसाठी कार्यशाळाही घेतल्या आणि घेताहेत.गुरुवारपासून दुबईत प्रदर्शनवसंत आणि पंकज नागपुरे यांच्या अक्षरांच्या कलाकृती, चित्र आणि ह्यकॅलिग्राफीचा अविष्कार दुबईत भरणा:या ह्यउद्योग इंडियाच्या प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत. मराठमोळ्या भावंडांना या प्रदर्शनात एक स्टॉल देण्यात आला आहे. या प्रदर्शनात भारत, दुबई आणि द.आफ्रिका या तीन देशातील कलावंतांना स्थान देण्यात आले आहे. दि.23 ते 25 नोव्हेंबर या तीन दिवसीय प्रदर्शनासाठी नागपुरे बंधू मंगळवारी रवाना होणार आहेत.