आॅनलाईन लोकमतअमळनेर, दि.२८ - पंजाब हरियाणा राज्यांसाठी वापरल्या जाणाºया राशी ७७१ बियाण्यांच्या पाकिटांचे होलोग्राम लावून राशी ६५९ च्या नावाने बनावट बियाणे गुजरात येथून आणून अमळनेरला विकणाºया चौघांच्या टोळीला अमळनेर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत वाहनासह सव्वा सात लाखाचा माल जप्त केला आहेकृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांना अमळनेर येथील दिनेश शंकर महाजन हा तरुण ६०० रुपये किमतीचे संकरित कापूस या पिकाचे राशी ६५९ या बियाण्याचे पाकिट विकत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी मोहीम अधिकारी पी.एस.महाजन , कृषी विस्तार अधिकारी अमोल भदाणे, पोलीस कर्मचारी विजय साळुंखे, रवींद्र पाटील, योगेश महाजन यांच्यासह २७ रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजता सापळा लावला. दिनेश महाजन हा खबरीला धुळे रस्त्यावरील राजभवन बंगल्याशेजारी ४ पाकिटे विक्री करताना पकडले. त्याच्या जवळील पाकिटांचे होलोग्राम स्कॅन केले असता पाकिटावरील उल्लेख आणि होलोग्राम वरील उल्लेख व प्रत्यक्ष बियाणे यात तफावत आढळली. बियाणे किशोर शामराव महाजन याच्याकडून घेतल्याचे समजले. त्याचा शोध घेतला असता तो रात्री ९ वाजता चोपडा रस्त्यावर सापडला. त्याने हे बियाणे पिंपळी येथील नितीन रमेश चव्हाण हा पुरवत असल्याचे सांगितले. पथकाने रात्रीच त्याच्याकडे बियाण्यांची मागणी केली असता त्याने रात्री चोपडा रस्त्यावर बाबाजी हॉटेल शेजारी माल आणून देतो असे सांगितले. रात्री १०.४५ वाजता संदीप मधुकर साळी रा अमळनेर याच्या वाहन क्र एम एच १९ सी एफ ४२६७ मध्ये संदीप व नितीन चव्हाण दोघे २९९ बीटी कापूस बियाण्याचे पाकिटे घेऊन आले असता त्यांच्यावर छापा टाकला. चौकशी दरम्यान राशी ७७१ हे बियाणे फक्त पंजाब व हरियाणा या राज्यात च विक्री होतात आणि ते बियाणे ३० एप्रिल पूर्वीच लावली जातात अशी माहिती मिळाली. पथकाने २ लाख २४ हजार २२० रुपयांच्या बियाण्यासह ५ लाखाचे वाहन आरोपीसह ताब्यात घेतलेकृषी विस्तार अधिकारी अमोल भदाणे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात दिनेश महाजन, किशोर महाजन, नितीन चव्हाण, संदीप साळी या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेरात बनावट बियाणे विक्री करणाऱ्या चौघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 2:53 PM
पंजाब हरियाणा राज्यांसाठी वापरल्या जाणाºया राशी ७७१ बियाण्यांच्या पाकिटांचे होलोग्राम लावून राशी ६५९ च्या नावाने बनावट बियाणे गुजरात येथून आणून अमळनेरला विकणाºया चौघांच्या टोळीला अमळनेर पोलिसांनी अटक केली.
ठळक मुद्देपोलीस व कृषी विभागाची संयुक्त कारवाईअमळनेर पोलिसांचा चौघांविरूद्ध गुन्हा दाखलकारवाईत सव्वा दोन लाखांच्या बियाण्यासह वाहन जप्त