लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : स्थानिक कलावंतांनी एकत्रित येत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भीमामुळं सारं जग दिसतं रं... या मराठी भीमगीताची निर्मिती केली आहे. हे गीत १२ एप्रिल रोजी प्रदर्शीत करण्यात आले आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन केले आहे. तरी जयंतीउत्सवाचा हा आनंद घरीच साजरा करण्यासाठी शारदा बाविस्कर यांनी या गीताची निर्मिती केली आहे. गायक - संगीतकार अमोल संगीता अरुण हे असून संकलन हेमराज सोनवणे यांनी तर गीते दिग्दर्शक आकाश बाविस्कर यांची आहेत.
गायक, संगीतकार अमोल ठाकूर, चाल- दर्शन गुजराथी, बेंजो बुद्धभूषण मोरे तर त्यांना साथ देणार पंकज बारी, दर्शन गुजराथी, आकाश बाविस्कर, वेद वानखेडे, दीपक महाजन तर प्रत्यक्ष भूमिकेत वैभव मावळे, दीपक महाजन, वेद वानखेडे, अमोल ठाकूर, बुद्धभूषण मोरे, दर्शन गुजराथी, आकाश बाविस्कर होते. यासह दिशा ठाकूर, कल्याणी जगताप, कुणाल विसपुते, सचिन कापडे, आकाश बाविस्कर, नीलेश भोई, गौरव विसपुते, कल्पेश व्हीरोडकर, विक्रम कापडणे, सचिन सोनार, हारून तडवी यांनी सहकार्य केले.