जळगाव : मनपातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील जन्म नोंदणी विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिक जेरीस आलेले पहायला मिळत आहे. आधीच या विभागातून जन्माच्या नोंधीचे सात तर मृत्यू नोंदणीच्या चार वर्षाचे रेकॉर्ड गायब असतानाच, २००१ मध्ये सुमारे ४० वर्ष जुन्या नोंदी असलेल्या सीडीज व संगणकीकरणाचा रेकॉर्डही मनपातून गायब झाल्याचा धक्कदायक प्रकार उघड झाला आहे.जन्म-मृत्यूचे दाखले हे नागरिकांना नेहमी उपयोगात पडणारे आहेत. मात्र, मनपातून काही वर्षांचे दाखले हे गायब झाले असल्याने नागरिकांना न्यायालयीन क्लिष्ठ प्रक्रियेतून जावे लागत आहे. मनपाच्या या गलथान कारभाराबाबत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकार संगणीकरण व आॅनलाईनकडे वाटचाल करीत असताना मनपा मात्र त्यात मागे आहे. त्यामुळे या विभागातील रेकॉर्डचे संगणकीकरण होणे गरजेचे असताना, या विभागाचे काम मात्र जुन्या काळाप्रमाणेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.‘लोकमत’च्या वृत्तानंतर लॅमिनेशनचे काम सुरुमनपाकडे सन १९०१ पासूनचे देखील रेकॉर्ड आहे.जुने रजिस्टर असल्याने ती आता जीर्ण झाली आहेत. मात्र, याकडे देखील मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने हे रेकॉर्ड देखील नष्ट होण्याची भिती आहे. याबाबत ‘लोकमत’ ने १३ डिसेंबरच्या अंकात वृत्त प्रसिध्द केले होते. अखेर या वृत्ताची दखल जन्म-मृत्यू विभागाकडून घेण्यात आली असून, सर्व जुन्या रेकॉर्डचे आता लॅमीनेशन करण्यात येणार असल्याची माहिती जन्म-मृत्यू विभागाचे निबंधक डॉ.विकास पाटील यांनी दिली आहे. हे काम करण्याची जबाबदारी मनपाचे अभियंता योगेश बोरोले यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.१८ वर्षांपूर्वीच ४० वर्षाच्या रेकॉर्ड करण्यात आले संगणकीकृतसध्याचा डिजीटल काळातही मनपाच्या जन्म-मृत्यू विभागाने कात टाकलेली नाही. २०००-२००१ मध्ये तत्कालीन नगरसेवक हरिश मिलवानी यांनी या विभागातील सुमारे ४० वर्षाचा रेकॉर्डच्या सीडी तयार करून घेतल्या होत्या. तसेच सीए प्र्रशांत अग्रवाल यांच्या मदतीने सर्व रेकॉर्ड संगणकीकृत देखील करून घेण्यात आले होते. मात्र, हे रेकॉर्ड मनपात उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.
मनपाच्या जन्म-मृत्यू विभागातील सीडीज व रेकॉर्डही झाले गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:28 PM
गलथान कारभार
ठळक मुद्दे२००१ मध्ये तयार करण्यात आले होते रेकॉर्ड