आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३१ - प्लॅस्टिक बंदीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडून काही तोडगा निघण्याची अपेक्षा असताना ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने जळगावात प्लॅस्टिक असोसिएशनच्या पदरी निराशा पडली आहे. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामुळे जळगावात सात कंपन्यांना फटका बसून शेकडो व्यावसायिकांवर बेकारीची कुºहाड ओढावणार आहे. त्यामुळे या बाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी प्लॅस्टिक असोसिएशनची आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस ३० रोजी जळगाव येथे येणार असल्याने त्यांना निवेदन देण्यात येणार होते, मात्र ऐन वेळी त्यांचा दौरा रद्द झाल्याने हिरमोड झाला.मुंबई येथे त्यांची भेट घेऊन समस्या मांडू, अशी माहिती महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशनचे कार्यकारीणी सदस्य तथा जळगाव जिल्हा इंडस्ट्री असोसिएशनचे (जिंदा) उपाध्यक्ष किरण राणे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने जळगावात प्लॅस्टिक असोसिएशनच्या पदरी निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:23 PM