आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २ : वैद्यकीय निष्काळजीपणा व कारकुनी त्रुटीमुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करणे बंद करा, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील डॉक्टर्स यांनी उपवास करून सत्याग्रह आंदोलन केले.
जळगाव शाखेतर्फे सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत आयएमए हाऊस येथे आयएमएचे अध्यक्ष डॉ.विश्वेश अग्रवाल, सचिव डॉ.राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने आंदोलनात सहभागी झाले. कारकुनी त्रुटी आणि अल्पवयीन अनुपालन पीसीपीएनडीटी कायद्याच्या गुन्हेगारी तरतुदींना आकर्षित करु नये, पीसीपीएनडीटी अधिनियम सामाजिक-आर्थिक समस्येसाठी वैद्यकीय उपाय आहे, तो या समस्येचे निराकरण करु शकत नाही. स्त्रीभृणहत्या, बालमृत्यूचे सामाजिक आणि आर्थिक कारण सोडविण्याशिवाय योग्य स्त्री-पुरुष कायम ठेवता येत नाही, असे डॉ.विश्वेश अग्रवाल व डॉ.राजेश पाटील म्हणाले.
दरम्यान, आंदोलन सुरु असतानाच डॉ.अग्रवाल व पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी डॉ.सुदर्शन नवाल, डॉ.जितेंद्र कोल्हे, डॉ.जगमोहन छाबडा, डॉ.धनंजय पाटील, डॉ.गणेश भारुळे, डॉ.सुशील राणे, डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.सुनील गाजरे, डॉ.तिलोत्तम गाजरे यांच्यासह अनेक डॉक्टरांनी सहभाग नोंदविला.
अशा आहेत मागण्यानेक्स्ट ऐवजी एमबीबीएस परीक्षा घ्यावी, एक औषध,एक कंपनी किंमत असावी,नीट परीक्षेसाठी नियमात सवलत असावी, प्रत्येक सरकारी आरोग्य समितीत आयएमए सदस्यांची नेमणूक व्हावी, डॉक्टरांवरील ग्राहक संरक्षण कायद्यात नुकसान भरपाईची तरतूद असावी,उपचार आणि नियंत्रणात व्यावसायिक स्वायत्तता असावी यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे.