ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 04- कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या जळगाव बंदमुळे बुधवारी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. यामुळे सुवर्णबाजार, दाणाबाजार तसेच इतर बाजारपेठेतील जवळपास 90 कोटींची उलाढाल ठप्प झाली. बाहेर गावाहून खरेदीसाठी येणारी वाहनेही न आल्याने व दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत सकाळपासूनच सर्वत्र शुकशुकाट होता.
125 सुवर्णपेढय़ा बंदसुवर्णनगरी अशी ख्याती असलेल्या जळगावात सोने खरेदीसाठी दररोज मोठी गर्दी असते. मात्र बुधवारी बंदमुळे 125 पैकी एकही सुवर्णपेढी उघडलेली नव्हती. शहरातील मोठय़ा दालनांसह लहान-लहान दुकानाही बंद असल्याने सराफ बाजारात शांतता होती. दिवसभर बाजार बंद असल्याने सोने-चांदीतील जवळपास चार ते पाच कोटींची उलाढाल ठप्प झाली.
दाणाबाजारात शुकशुकाट1500 वस्तूंची खरेदी-विक्री होणा:या दाणाबाजारात जळगाव जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भातून खरेदीसाठी व्यावसायिक येत असतात. मात्र बंदमुळे सकाळपासूनच दुकाने बंद असल्याने दाणाबाजारात सर्वत्र शुकशुकाट होता. दररोज साधारण 150 ट्रक व इतर वाहने येथे येत असतात. मात्र बंदमुळे ही वाहने आलीच नाही व खरेदी-विक्री पूर्णपणे थांबून 30 कोटींची उलाढाल ठप्प झाली होती.
मुख्य मार्केट बंदशहरातील मुख्य मार्केट असलेल्या महात्मा फुले मार्केटसह गोलाणी मार्केट, बी.जे. मार्केट, महात्मा गांधी मार्केट तसेच इतरही मार्केट बंद होती. या सोबतच हार्डवेअर, फर्निचरची दुकाने, जनरल स्टोअर्स, शहर व परिसरात असलेली वाहनांची दालनेही बंद होती.
मॉल, सुपरशॉप बंद शहरातील खान्देश मॉलसह इतर 10 सुपरशॉपही सकाळपासून बंद होती. या ठिकाणी शहरातील काही ग्राहक येत होते. मात्र बंद पाहून ते माघारी परतले.
कामगार बसूनदाणाबाजारासह सर्वच ठिकाणचे दुकाने बंद असल्याने तेथील कामगार बसून होते. बाजारपेठेत दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
व्यापारी सकाळपासून थांबूनसकाळी दुकाने उघडायची की नाही या विषयी माहिती नसल्याने बहुतांश व्यापारी सकाळी आपापल्या दुकानाजवळ पोहचले होते. मात्र बंदच्या हाकेमुळे कोणीही दुकाने उघडली नाही. त्यानंतर दुपार्पयत बरेच व्यापारी दुकानाबाहेर थांबून होते.
बँका सुरू, मात्र ग्राहक नाहीबंद दरम्यान शहरातील बँका सुरू होत्या. मात्र ग्राहकच नव्हते. त्यामुळे बँकामध्ये दररोज सारखी गर्दी नव्हती. यामुळे व्यवसाहारांवरही परिणाम झाल्याचे बँकांच्यावतीने सांगण्यात आले.
रुग्णालय सुरळीत सुरूबंद दरम्यान शहरातील रुग्णालय सुरळीत सुरू होते. रुग्णसेवेला कोणतीही बाधा आली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मंगळवारी डॉक्टरांचा बंद होता, त्यामुळे बुधवारी अधिक गर्दी वाढली. आपत्कालीन सेवा म्हणून रुग्णालयांसोबतच औषधी दुकानेही सुरू होती. केवळ बाजारपेठ भागातील काही औषधी दुकाने बंद होती. गणेश कॉलनी भागातील रुग्णालयावरील दगडफेक वगळता इतर रुग्णालय सुरळीत सुरू होती.