आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२५ : शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारपासून आचार संहिता लागू झाल्यामुळे शहरात मनपा व शासनाकडून सुरु असलेल्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या कामांना ‘ब्रेक’ लागला आहे. दरम्यान, ही निवडणूक संपल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने आता विकासकामांना सप्टेंबर महिनाच उजाडणार आहे.गेल्याच महिन्यात शहरातील विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या २५ कोटीच्या निधीतील १७ कोटीच्या निधीला शासनाने नुकतीच मान्यता दिली होती. त्यातून शहरात विविध ठिकाणी ५९ कामे सुरु केली जाणार होती. त्यासाठी निवीदा प्रक्रिया राबविण्याबाबत देखील सूचना दिल्या होत्या. मात्र, आता ही सर्व कामे आचारसंहितेमुळे तीन ते चार महिने रखडणार आहेत.मेहरूण तलावाच्या पेरीफेरीसह डांबरीकरणाचेही काम थांबणारमेहरूण तलावाच्या पेरीफेरीसाठी ४ कोटी ५३ लाख रुपयांचा निधीला महासभेने नुकतीच मान्यता दिली होती. तसेच शासनाच्या मान्यतेसाठी हा ठराव पाठविण्यात आला आहे. याचबरोबर मेहरूण तलावाच्या डांबरीकरणासाठी ३ कोटी ४० लाखाच्या कामांसाठी मनपाने नुकतीच निवीदा काढली. मात्र, या कामांसाठी कार्यादेश न दिल्यामुळे हे काम देखील रखडणार आहे. यासह ट्राफीक गार्डनचे सुशोभिकरणासाठी देखील निवीदा प्रक्रिया पार पडली होती. मात्र, हे काम देखील थांबले आहे.मुलभूत सुविधांच्या कामांनाही ‘ब्रेक’दलित वस्ती सुधार योजनेतील १ कोटी ७१ लाख, नगरोथ्थानचे ७१ लाख अशा एकुण १६ कामांच्या निवीदा काढण्याचे काम देखील अद्याप झालेले नसल्याने ही कामे देखील होणार नाही. यासह शहरातील मूलभुत सुविधांसाठी प्राप्त झालेल्या ५ कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव अद्याप महासभेत सादर झालेला नाही. २५ कोटी रुपयातील आधी प्राप्त झालेल्या ७ कोटी रुपयांच्या निधीतून मनपातील ६ लिफ्ट, नाल्यांना संरक्षण भिंत अशी कामे करण्यात येणार होती. मात्र, या कामांची निवीदा काढून कार्यादेश देण्यात आलेले नाही.या कामांना लागणार ‘ब्रेक’५ कोटीतून प्राप्त झालेल्या १७ कोटीच्या निधीतून होणारी ५९ कामांची निवीदा काढणे बाकी२५ कोटीच्या पहिल्या टप्प्यात मिळालेल्या ७ कोटीतून होणारी कामेमुलभूत सुविधांसाठी ५ कोटीच्या कामांसाठी महासभेत प्रस्ताव सादर करणे अद्याप प्रलंबितदिड कोटीमधून सुशोभिकरण करण्यात येणाऱ्या ट्राफीक गार्डनच्या कामांसाठी कार्यादेशाची प्रतिक्षामेहरूण तलाव डांबरीकरणाचे काम थांबणारनगरोथ्थान व दलीतवस्ती सुधारातील कामेही रखडणार
आचारसंहितेमुळे जळगावात ४० कोटींच्या कामांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:42 PM
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारपासून आचार संहिता लागू झाल्यामुळे शहरात मनपा व शासनाकडून सुरु असलेल्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या कामांना ‘ब्रेक’ लागला आहे.
ठळक मुद्दे५ कोटीतून प्राप्त झालेल्या १७ कोटीच्या निधीतून होणारी ५९ कामांची निवीदा काढणे बाकी२५ कोटीच्या पहिल्या टप्प्यात मिळालेल्या ७ कोटीतून होणारी कामेमुलभूत सुविधांसाठी ५ कोटीच्या कामांसाठी महासभेत प्रस्ताव सादर करणे अद्याप प्रलंबित