आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२८ : गेल्या महिन्यात गणेश कॉलनीतून लांबविलेली कार चोरट्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे सोडून पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कार चोरणारे चोरटे तेलंगणाचे असून हैदराबाद येथील गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर आहे. या पथकाला पाहून या चोरट्यांनी गाडी सोडून धूम ठोकली.गणेश कॉलनीतील गितेश मधुकर मेश्राम यांच्याकडे २४ फेब्रुवारी रोजी चोरटे घरफोडीसाठी आले होते. घरात रोख रक्कम व दागिने हाती न लागल्याने त्यांनी कपाटात ठेवलेली कारची चावी घेऊन पाच लाख रुपये किमतीची कार लांबविली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना जळगावातून चोरलेली कार देऊळगाव राजा येथे जालना रस्त्यावर आढळून आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे यांनी रवींद्र पाटील, दीपक पाटील, प्रवीण हिवराळे, विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांचे पथक देऊळगाव राजा येथे रवाना केले होते. कार लांबविणारे चोरटे घरफोडी करणारे असून ते तेलंगणा राज्यातील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. हैद्राबाद गुन्हे शाखेचे पथक या चोरट्यांच्या मागावर असताना हे चोरटे देऊळगावात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार हैद्राबाद गुन्हे शाखेचे निरीक्षक व्यंकट्या व त्यांचे सहकारी देऊळगाव राजा येथे आले होते. या पथकाला पाहताच या चोरट्यांनी जालना रस्त्यावर गाडी सोडून पलायन केले.
जळगावातून चोरलेली कार देऊळगाव राजा येथे सोडून आरोपींचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 8:11 PM
तेलंगणाच्या चोरट्यांच्या मागावर हैदराबाद गुन्हे शाखेचे पथक
ठळक मुद्देजळगाव व हैद्राबादचे पथक देऊळगावाततीन दिवस लावला सापळाचोरट्यांनी केले जालना रस्त्यावर गाडी सोडून पलायन