लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव/भुसावळ/चाळीसगाव/ नंदुरबार : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील आसनगाव-वाशिंद दरम्यान कसारा घाटात १२२९० अप नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी सकाळी ६.३३ वाजता झालेल्या अपघाताचा मोठा फटका खान्देशातील प्रवाशांनाही बसला आहे़मुंबईहून येणारी ५११५३ मुंबई-भुसावळ ही पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली. तसेच नऊ एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलल्याने प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला. यामुळे जळगाव रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली होती़ भुसावळकडून मुंबईकडे जाणाºया रेल्वेगाड्या नंदुरबार मार्गाने वळवण्यात आल्या आहेत़ चाळीसगाव रेल्वेस्थानकात अनेकांना बस व इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला, तर काहींनी प्रवासच रद्द केला.या अपघातामुळे दिल्ली-मुंबई आणि नागपूर-मुंबई मार्गावरील प्रवासी व मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, मुंबईहून निघणाºया अनेक लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या पुणे, दौंड, मनमाडमार्गे वळविण्यात आल्या आहेत. सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक व पंजाब मेल इगतपुरीपर्यंतच धावणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून भुसावळसह मनमाड व नाशिक येथे हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.याशिवाय दिल्ली, नागपूरकडून येणाºया अप मार्गावरील पुष्पक, गोदान, पाटलीपुत्र एक्स्प्रेस जळगाव, सुरत, वसईमार्गे मुंबई अशा सोडण्यात आल्या आहेत.दरम्यान, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, २२१३० अलाहाबाद-एलटीटी एक्स्पे्रस या गाड्यांना मनमाड, दौंड, पुणे यामार्गे सोडण्यात आले आहे.गाड्यांना विलंबअप आणि डाऊन मार्गावर धावणाºया सर्वच प्रवासी गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. असे असले तरी प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी म्हणून भुसावळ रेल्वे प्रशासनाने ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले आहे.प्रवाशांना रेल्वे गाड्यांच्या धावण्याच्या वेळा कळाव्या म्हणून नियमितपणे रेल्वेस्थानकावर अनाऊन्स करण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली.लहान रेल्वेस्थानकांवरदेखील प्रवाशांच्या सोयीसाठी बाहेरच्या हॉटेलचालकांना प्रवाशांना खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.प्रवासी हैराणलांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाºया प्रवाशांची गाड्या उशिरा व फेºयाने धावत असल्याने प्रचंड प्रमाणावर गैरसोय होत आहे.कामायनी रावेरला थांबून११०७२ अप कामायनी एक्स्प्रेस रावेर येथे बराच वेळ थांबून होती. तिचा मार्ग ठरल्यानंतर तिला पुढे जाऊ देण्यात येणार आहे.बस सज्जप्रवाशांनी मागणी केल्यास भुसावळहून मुंबईला जाण्यासाठी परिवहन मंडळाने दोन बस सज्ज करून ठेवल्या आहेत, अशी माहिती आगार व्यवस्थापक हरीश भोई यांनी दिली. चालक-वाहकही तयार आहेत. प्रवाशांची संख्या वाढली म्हणजे तत्काळ बस सोडण्यात येईल.रिफंडसाठी अडचणीमार्ग बदलून व रद्द झालेल्या प्रवासी गाड्यांच्या तिकिटांचे पैसे मिळण्यास आरक्षण खिडकीवरून अडचणी येत असल्याची समस्या अनेक प्रवाशांनी मांडली.दरम्यान, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी मात्र प्रवाशांना रिफंड दिला जात आहे, कोणत्याही प्रवाशाची आपल्याकडे तक्रार आली नसल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली.नंदुरबारहून ९ गाड्या मार्गस्थवसई-उधना-भेस्तान- नंदुरबार ते जळगाव यादरम्यान मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ९ एक्स्प्रेस ेगाड्या मार्गस्थ झाल्या होत्या़ तर कानपूर उद्योगनगरी, मुंबई-हावडा मेल व्हाया नागपूर, शालिमार एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, कोईमतूर-जबलपूर एक्स्प्रेस या गाड्या भुसावळकडून नंदुरबार मार्गाने सुरतकडे रवाना करण्यात आल्या आहेत़तूर्तास केवळ १४ गाड्यांना या मार्गावरून मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे़ मार्गावर होळजवळ किरकोळ स्वरूपाचे काम सुरू असल्याने गाड्यांची संख्या कमी आहे़ यात गाड्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़चाळीसगाव : नऊनंतर गाडीच नाहीरेल्वेस्थानकात मंगळवारी सकाळी ८.५५ वा. भुवनेश्वर एक्सप्रेस (१२८८० डाऊन) आली. नंतर मुंबई मार्गाची कोणतीही गाडी स्थानकात आली नाही. दुपारपर्यंत अनेक प्रवासी स्थानकात थांबून होते. गाड्याच नसल्याने दुपारनंतर पूर्णपणे शुकशुकाट पसरला.कुर्ला-वाराणसी (कामायनी), पुणे- भुसावळ हुतात्मा, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, गोरखपूर-कुर्ला एक्स्प्रेस (काशी एक्स्प्रेस) व इतरही अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. प्रवाशांना गाड्यांची माहिती व्हावी यासाठी फलकावर तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे उद्घोषणा केली जात होती, अशी माहिती स्टेशन मास्टर एन.पी.बडगुजर यांनी दिली.पाचोरा स्थानकावर भुसावळ पॅसेंजरचा तीन तास खोळंबापाचोरा स्थानकावर महानगरी एक्स्प्रेस सकाळी ८.४२ वा. आली व येथे थांबा नसतानाही ती येथे बराच वेळ थांबली व नंतर येथूनच या गाडीला माघारी फिरवून जळगाव-सुरतमार्गे मुंबईला रवाना केले.११.५० वाजता महानगरी तीन तास खोळंबा होऊन परत गेली, तर भुसावळ-मुंबई पॅसेंजर सकाळी ९.२० वाजता आली व तीन तास स्थानकावर रोखून ठेवण्यात आली. अखेरीस साडेबारा वाजता देवळालीपर्यंत सोडण्यात आली.अन्य गाड्या जळगावहून सुरतमार्गे वळविण्यात आल्या. काही मनमाड-पुणेमार्गे रवाना करण्यात आल्या. काशी एक्स्प्रेसही जळगावहूनच सुरतमार्गे पाठविण्यात आली. पाचोरा स्थानकावर दोन गाड्या तीन तास थांबून होत्या.डीआरएमसह अधिकारी नियंत्रण कक्षात...भुसावळचे डीआरएम आर.के.यादव यांच्यासह वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक नरपतसिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सकाळपासृूनच डीआरएम कार्यालयातील नियंत्रण कक्षात थांबून गाड्यांचे संचलन करीत होते.जळगाव रेल्वे स्टेशनवरील प्रतीक्षालयात आराम करताना प्रवासी.
दुरांतोच्या अपघाताने जिल्हाभर प्रवासी खोळंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:01 AM
सेवाग्राम नाशिकपर्यंतच : अनेक गाड्यांच्या मार्गात बदल, सुरतमार्गेही वाहतूक वळविली
ठळक मुद्देजळगाव रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दीलांब पल्ल्याच्या गाड्या भुसावळ, जळगाव, सुरत, वसईमार्गे मुंबईकडे सोडण्यात आल्याभुसावळ, मनमाड, नाशिक येथे हेल्पलाइन सुरू केली आहे.