जळगाव : नागपूर येथून मुंबई जाणा-या दुरांतो (अप १२२९०) या सुपरफास्ट एक्सप्रेसवर शुक्रवारी पहाटे अडीच वाजता सिग्नल कट करुन धाडसी दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी गाडीत प्रवेश करुन एका जणाचे चार लाख रुपये तर अनिता सिताराम चिंचोरिया (रा.नागपूर) या महिलेच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबविले. अर्धा तास धिंगाणा घालून दरोडेखोर पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी इगतपुरी व मुंबईत लोहमार्ग पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई-नागपुर या दुरांतो एक्सप्रेसला भुसावळ येथून सुटल्यानंतर तांत्रिक कारणाव्यतिरिक्त थेट कल्याणलाच थांबा आहे. भुसावळ स्थानकावरुन गाडी सुटल्यानंतर माहेजी स्थानकापासून एक किलोमीटर अलीकडे म्हसावदच्या दिशेने पोल क्र.३८८/१२-१४ जवळील एम.वाय.जे.एस.२ हा सिग्नल दरोडेखोरांनी वायरींग कापून कट केला. त्यामुळे ही गाडी २.२४ वाजता थांबविण्यात आली. गाडी थांबताच काही दरोडेखोरांनी वेगवेगळ्या बोगीत चढून तसेच खिडकीतून हात टाकून झोपलेल्या प्रवाशांचा ऐवज लुटला. एस.५ या वातानुकुलीत बोगीत बसलेल्या अनिता चिंचोरिया व अन्य महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी लांबविण्यात आली. काही प्रवाशांच्या बॅगा लांबविण्यात आल्या. त्यात एका प्रवाशाचे चार लाख रुपये होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. यातील चिंचोरिया या महिलेने इगतपुरी येथे लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उर्वरित प्रवाशी मुंबई येथे तक्रार देणार होते. या सर्व तक्रारी शून्य क्रमांकाने भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग होतील, अशी माहितीही अधिकाºयांनी दिली.
सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन दुरांतो एक्सप्रेसमध्ये धाडसी दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:59 PM
नागपूर येथून मुंबई जाणा-या दुरांतो (अप १२२९०) या सुपरफास्ट एक्सप्रेसवर शुक्रवारी पहाटे अडीच वाजता सिग्नल कट करुन धाडसी दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी गाडीत प्रवेश करुन एका जणाचे चार लाख रुपये तर अनिता सिताराम चिंचोरिया (रा.नागपूर) या महिलेच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबविले. अर्धा तास धिंगाणा घालून दरोडेखोर पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी इगतपुरी व मुंबईत लोहमार्ग पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.
ठळक मुद्देमाहेजी स्थानकाजवळील घटना महिलेचे मंगळसत्र तर एकाचे चार लाख लांबविलेतक्रारी शून्य क्रमांकाने भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग