ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21 - जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी संध्याकाळपासून ते गुरुवारी सकाळर्पयत जोरदार हजेरी लावल्याने केळी व कपाशीचे नुकसान झाले असून महसूल विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहे. गेल्या 24 तासात विक्रमी 441.4 मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक 78 मि.मी. पाऊस झाला. चाळीसगाव तालुक्यात गाय तर एरंडोल तालुक्यात बैल व वासराचा या परतीच्या पावसामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे यंदाच्या मोसमात प्रथमच गिरणा नदीला पूर आला असून दापोरा तसेच कांताई बंधारा ओसंडून वाहत आहे. एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी झाली असून या तालुक्याची सरासरी शंभरीर्पयत पोहचण्यास केवळ 2.1 टक्के पावसाची गरज असल्याचेही चित्र आहे. तर धरणसाठय़ातही वाढ झाली आहे. बुधवार, 20 सप्टेंबर संध्याकाळपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली व तो अधून-मधून सकाळर्पयत सुरूच होता. यंदाच्या मोसमात गिरणा नदीला पहिल्यांदा पूर आल्याने सर्वाना दिलासा मिळाला आहे. पिकांचे नुकसानजिल्ह्यात या परतीच्या पावसाने केळी, कपाशी पिकाचे नुकसान केले असून त्याचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहे. हे पंचनामे पूर्ण झालेले नसल्याने नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक 78 मि.मी. पाऊस झाला तर सर्वात कमी 9.2 मि.मी. पाऊस पारोळा तालुक्यात झाला. चार प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठाजिल्ह्यातील मोठय़ा जलसाठय़ांमध्ये वाढ झाली असली तरी चार प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. हतनूर धरणात 81.18, गिरणा धरणात 64.33 तर वाघूर धरणात 69.31 टक्के जलसाठा आहे. अगAावती, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. गेल्या आठवडय़ात शून्य टक्के असलेल्या हिवरा, बहुळा प्रकल्पामध्ये अनुक्रमे 16.31 व 3.79 टक्के जलसाठा झाला आहे. अंजनी प्रकल्पातील साठा केवळ 4.28 टक्केच आहे. चाळीसगावला वीज पडून एक गाय तर एरंडोल तालुक्यात एक बैल व वासरू मृत्यूमुखी पडले. डिकसाई परिसरात नुकसानडिकसाई परिसरात बुधवारी वादळी वा:यासह व गारपिटीमुळे उडीद, मूग, केळी, मका, ज्वारी, बाजरी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. 21 रोजी तलाठी नन्नवरे यांनी पंचनामा केला. या वेळी सरपंच सविता चव्हाण, पोलीस पाटील मंगलाबाई चव्हाण, राष्ट्रवादीयुवककाँग्रेसचेतालुकाध्यक्ष विनायक चव्हाण आदी उपस्थित होते. कांताई बंधारा फुल्लगिरणा नदीला पूर आल्याने या नदीवर बांधण्यात आलेला कांताई बंधारादेखील फुल्ल झाला असून यामुळे परिसरात सिंचन वाढीस मदत होणार आहे.दापोरा बंधारा भरलादापोरा येथील वार्ताहराने कळविल्यानुसार, कुरकूर नाल्याच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने दापोरा बंधारा ओसंडून वाहत आहे. या बंधा:यावर शिरसोली, रवंजा, खर्ची, रिंगणगाव, दापोरा, दापोरी या गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याने या पावसामुळे येथील प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. गावांचा संपर्क तुटलागिरणा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दापोरी, रवंजा, खर्ची या परिसरातून जळगावला येण्यासाठी सोयीचा असलेला मार्ग बंद झाल्याने या गावांचा संपर्क तुटला. दौलतपूरजवळील भगदाड बुजविण्याची मागणीदहीगाव बंधा:यापासून जवळच असलेल्या दौलतपूरनजीक भगदाड पडले असून ते बुजविण्याची मागणी होत आहे. बंधा:यातून पाणी सोडण्यात आले असून यामुळे कालवा फुटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले जात असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पावसाने गाठली वार्षिक सरासरीची सत्तरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 71.5 टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 663.3 मिलीमीटर असून मागील वर्षी 21 सप्टेंबर 2016 पयर्ंत वार्षिक सरासरीच्या 584.3 टक्के म्हणजेच 88.2 मिलीमीटर पाऊस झाला होता. हतनूर धरणाचे 20 दरवाजे अध्र्या मीटरने उघडलेगेल्या चोवीस तासात हतनूर धरणाच्या क्षेत्रात 30 मि.मी., गिरणा धरण क्षेत्रात 10 मि.मी. तर वाघूर धरण क्षेत्रात 50 मि.मी. इतका पाऊस पडल्याने हतनूर धरणातून 32739 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून यामुळे धरणाचे 20 दरवाजे अध्र्या मीटरने उघडण्यात आले आहे.जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 841 दलघमी उपयुक्त साठाजिल्ह्यात असलेल्या मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये एकूण 841.56 दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे. त्याची टक्केवारी 58.95 टक्के आहे. मंगरुळ 100 टक्के, सुकी 96.64, अभोरा 85.42, तोंडापूर 70.54, गुळ प्रकल्पात 59 तर मोर प्रकल्पात 57.14 टक्के उपयुक्त साठा आहे.