आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ७ - शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी दापोरा येथील तांदळे कुुटुंबीयांच्या खात्यावर साडेतीन लाखाचे कर्ज कायम आहे. कर्जाच्या विवंचनेत असलेल्या लाला भानुदास तांदळे (३८, रा. दापोरा) यांनी विषप्राशन केल्याने पुन्हा शासकीय अनास्थेत शेतकरी होरपळत असल्याचे समोर आले आहे. पित्या पाठोपाठ भाग्यश्री लाला तांदळे (१७) या मुलीने विष प्राशन केले व तिचा मृत्यू झाला.दापोरा येथील लाला भानुदास तांदळे या शेतकºयाने डोक्यावर कर्जाचा बोझा व मुलीच्या लग्नाच्या चिंतेने विषप्राशन केले. या घटनेनंतर आपल्यामुळे वडिलांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, या विचाराने त्यांची मुलगी भाग्यश्री हिनेदेखील रविवारी सकाळी ९ वाजता राहत्या घरी विष प्राशन केले. उपचारादरम्यान रविवारी रात्री ११ वाजता तिचा मृत्यू झाला. या घटनेने तांदळे कुटुंबीय हादरून गेले आहे.साडेतीन लाखाचे कर्जलाला तांदळे व त्यांना एक भाऊ असून वडिलांच्या नावावर सहा एकर शेती आहे. यातील प्रत्येकी दोन एकर शेती दोन्ही मुले कसतात व दोन एकर शेती आई-वडील करतात. यामध्ये तांदळे कुटुंबीयांवर साडेतीन लाखाचे कर्ज आहे. त्यात विहिरीला पाणी नाही, गेल्या तीन वर्षांपासून शेतीत उत्पन्न येत नसल्याने तांदळे कुटुंबीय सतत कर्जफेडीच्या चिंतेत असे.कर्जमाफीचा लाभ नाहीशासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत तांदळे कुटुंबीयांनी देखील कर्जमाफीसाठी अर्ज केला. दिवाळीपूर्वी कर्जमाफी मिळणार अशी आशा कुटुंबीयांना आहे. अद्याप कर्जमाफी मिळाली नाही व साडेतीन लाखाचे कर्ज कायम आहे. त्यात मुलीचेही लग्नाचे वय झाले. त्यामुळे लाला तांदळे यांनी कर्जाच्या बोझाखाली शेतात विष प्राशन केल्याची माहिती त्यांचे आतेभाऊ तथा विटनेर येथील सरपंच सुरेश गोलांडे यांनी दिली.दप्तर दिरंगाईचा फटकाधुळे जिल्ह्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यास दिरंगाई झाल्याने त्यांनी थेट मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला व त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना दापोरा येथील शेतकºयावरदेखील दप्तर दिरंगाईमुळे विषप्राशनाची वेळ आल्याचे दुर्देव असल्याचे त्यांचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या सर्वांमध्ये मुलीनेदेखील विषप्राशन केल्याने तिचा यात मृत्यू झाल्याने दप्तर दिरंगाईचा फटका या कुटुंबीयास बसला असल्याचेही नातेवाईकांचे म्हणणे आहे.दरम्यान लाला तांदळे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.
शासकीय अनास्थेत होरपळतेय दापो-याचे तांदळे कुटुंबीय, दप्तर दिरंगाईत गेला मुलीचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:14 PM
कर्जमाफीचा अर्ज भरूनही साडेतीन लाख कर्जाचा डोंगर कायम
ठळक मुद्दे धर्मा पाटील यांच्या पाठोपाठ दापोºयाच्या कुटुंबालाही झळासाडेतीन लाखाचे कर्जकर्जमाफीचा लाभ नाही