जळगाव : शासनाच्या महाराष्टÑ सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातंर्गत शहरातील विकास कामांसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. या निधीमुळे शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यावर प्राधान्य राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.अमृत योजनेतंर्गत सुरु असलेल्या कामांमुळे या योजनेची कामे संपल्यानंतरच रस्त्यांची कामे सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, आता रस्त्यांची कामे सुरु करावे की नाही याबाबतचे सर्व अधिकार आयुक्तांना दिले असल्याने शहरातील रस्त्यांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, नगरोत्थान निधीच्या नियमाप्रमाणे यात मनपाचा ३० टक्के हिस्सा राहणार आहे.वाढीव भागात मुलभूत सुविधामनपा आयुक्तांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जळगाव मनपाला शहर विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्याबाबतचे पत्रही मनपाला प्राप्त झाले. या निधीव्दारे शहरातील रस्त्यांच्या कामाला अधिक महत्व दिले जाणार आहे. रस्त्यांसह शहरातील वाढीव भागांमधील नागरिकांसाठी मुलभुत सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले.शंभर कोटींचा असा असेल प्रवासशासनाने मनपाला विकासकामांसाठी शंभर कोटींच्या निधीला मान्यता दिली असली तरी त्याचा प्रवास मोठा असणार आहे. मनपाला ज्या कामांसाठी निधी लागणार आहे. त्या कामांसाठी शासनाच्या तांत्रिक प्राधिकरणाकडून अभिप्राय घ्यावा लागेल. त्यानंतर मनपा संचालकाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. नंतर शासनाकडून अंतीम मंजुरी प्राप्त होईल.आमदार सुरेश भोळे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभारजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मनपा निवडणुकीच्या वेळेस महिनाभरात १०० कोटी रुपयांचा निधी आणू असे आश्वासन नागरिकांना दिले होते. त्यानुसार मनपाला १०० कोटीच्या निधीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आमदार सुरेश भोळे यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यावेळी आमदार चंदूलाल पटेल व हरिभाऊ जावळे उपस्थित होते.शासनाची डुलकीशासनाने पाठविलेले पत्र आयुक्तांना सोमवारी प्राप्त झाले. मात्र, या पत्रात जळगाव महानगरपालिकासह जिल्हा सांगली असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हा निधी नेमका जळगावला की सांगलीला हे कळत नव्हते. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जळगावसोबतच सांगलीमध्ये देखील भाजपाला बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्र्यांचे सांगलीवर देखील प्रेम असल्याने ही चुक झाली का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणारशंभर कोटी रुपयांच्या निधीमध्ये ज्या भागांमध्ये अमृत योजनेतंर्गत पाईप-लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या भागांमध्ये रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच मुख्य रस्त्यांच्या कामांसाठी अमृत योजनेचा आराखडा तपासून ज्या ठिकाणी खोदकाम होईल तेवढा भाग सोडून दिला जाणार आहे. मुख्य रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असून यामध्ये टॉवर चौक ते महाबळ चौक पर्यंतचा रस्ता व टॉवर चौक ते अजिंठा चौकापर्यंतचा रस्ता तयार के ला जाणार आहे. तसेच संपूर्ण रिंगरोडचे देखील काम हाती घेण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यांलगत काही भागांवर फुटपाथ तयार केले जाणार असून मुख्य चौकांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविले जाणार आहेत.
जळगावात १०० कोटींच्या निधीमुळे रस्त्यांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:06 PM
अमृत योजनेची काम सुरु असतानाही रस्ते होणार
ठळक मुद्देवाढीव भागातही मिळणार मुलभूत सुविधाआमदार सुरेश भोळे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार