पाचोरा, जि.जळगाव : पाचोरासह परिसरात झालेल्या अति वृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यासह हिवरा नदीला पूर आला. खडक देवळा धरण ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे पाचोरा शहरात हिवरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे तर पाचोरा-भडगाव परिसरात सुरू असलेल्या अति पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांची ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका अशा अनेक पिकांची नासाडी झाली आहे. कापसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी ज्वारी, मका, कापून ठेवलेले आहेत आणि त्यांना कोंब फुटलेले आहे. यामुळे शेतकºयांची व सर्वसामान्य नागरिकांनचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महसूल आणि कृषी अधिकाºयांनी तत्काळ पंचनामे करावेत. त्यासाठी आचारसंहिता शेतकरी बांधवांना आडवी येऊ नये आणि जिल्हाधिकाºयांनी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत आमदार किशोर पाटील यांनी केली आहे.
पाचोरा परिसरात अतिवृष्टी लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 3:19 PM
पाचोरा-भडगाव परिसरात सुरू असलेल्या अति पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांची ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका अशा अनेक पिकांची नासाडी झाली आहे.
ठळक मुद्देमुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यासह हिवरा नदीला पूरअति पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांची ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका अशा अनेक पिकांची नासाडी