शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

अमळनेरातील भाटे भगिणींची भूतदया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:05 AM

नि:स्वार्थ सेवा

महेंद्र रामोशेअमळनेर - बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली आणि त्यांना पुन्हा माणूस म्हणून उभे केले. त्याच धर्तीवर अमळनेर शहरातील पोलीस लाईन सामोरील भाटे भगिनी मुक्या प्राण्यांची सेवा करत आहेत. अपघातग्रस्त, रोगट, अर्धमेलेले मोकाट श्वानांची सेवा करीत त्यांच्यासाठी आपले जीवन समर्पित या भगिनींनी केले आहे. आपल्या आई आणि भावा पासून मिळालेला वारसा कुसुम भवानजी भाटे, चारुशीला भाटे, आणि अनुपमा भाटे या तिघी बहिणी चालवत आहेत.शहरात मोकाट फिरणाऱ्या श्वानांचा कुठेही अपघात झाला किंवा त्यांना काही दुर्धर आजर लागला, नाल्यात पडला तर ते श्वान या भाटे भगिनींकडे सोडले जाते. या तिन्ही बहिणी धावत-पळत जाऊन त्या श्वानाला तात्काळ दवाखान्यात नेऊन त्यावर स्वखर्चाने उपचार करतात. अनेकवेळा उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून त्यांनी कर्ज देखील घेतले आहे.संकटांना द्यावे लागते तोंडकुसुम भाटे यांनी आपली कहाणी सांगताना सांगितले की, आम्ही श्वानांची सेवा करतो म्हणून आमच्यावर दगड धोंडे फेकले जातात, मारहाण केली जाते, घाण फेकली जाते इतकेच नाही आम्हाला वेडे ठरवले जाते. मात्र असे असले तरी आम्ही कुठेही श्वानांना त्रास होत असेल तर आम्ही त्याची सुटका करतो आणि त्याला घरी घेऊन येतो. आज या भाटे भगिनींकडे १२५ लहान मोठे श्वान आहेत. त्यात अपघातग्रस्त झालेली, कोणाला आजार झालेला तर कोणते विहीर,गटारमध्ये पडलेले असे अनेक श्वान त्यांनी आज वाढवलेली आहेत.आई आणि भावाने स्थापन केलेल्या ‘ज्ञान कस्तुरी श्वान सेवा संस्थेच्या’ माध्यमातून या भगिनी श्वानांची सेवा करत आहेत. गेल्या ५०वर्षांपासून हे सेवाकार्य सुरू आहे.या कार्यात त्यांना त्रास देणारे कमी नाहीत मात्र मदत करणारे सुद्धा आहेत. त्यांची नावे या भगिनींच्या तोंडपाठ आहेत. प्राण्यांचे औषधे मोफत देणारे जळगावचे डॉ.मनीष बाविस्कर, अजय ललवाणी, अमोल नाथबुवा, ज्ञानेश्वर भोई, ज्ञानेश्वर पाटील, सिंदूबाई पारे, शांताराम बोरसे, धनराज पाटील आदी त्यांना दूध चारा आणि औषध मोफत देतात. इतकेच नव्हे तर न्या. दिनेश कोठलीकर यांच्या परिवाराचे सदस्यदेखील भरीव मदत करतात. त्यांची मुंबई येथे बदली झाली असली तरी ते आजदेखील मदत पाठवत आहेत, असा उल्लेख भाटे यांनी केलाश्वानासोबत भाटे भगिणींकडे १९ गाई आहेत. ज्या भाकड आहेत, मात्र तरीही त्यांची सेवा या भगिनी मनापासून करत आहेत. श्वान आणि गाई त्यांचे संगोपनासाठी पैसे नसतात. त्यामुळे त्यांना शासनाने अनुदान द्यावे, तसेच प्राण्यांच्या संगोपनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध कारून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ती पूर्ण व्हावी, अशी भाटे भगिनींची मागणी आहे. या मोकाट श्वानांची सेवा करता यावी म्हनून या भाटे भगिनीं अतिशय साधं जीवन जगतात व पैसे वाचवून श्वान, मांजर, आणि गाईची सेवा करतात.श्वानांची काळजी घ्याविदेशी जातीच्या श्वानांमुळे गावठी श्वानांवर अन्याय होतो. विदेशी श्वान पाळण्यापेक्षा प्रत्येकाने गावठी श्वान पाळावी, म्हणजे त्यांना आधार मिळेल व पोट भर जेवणदेखील मिळेल. शिवाय नगर परिषदने श्वानांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच नागरिकांदेखील घराच्या बाहेर पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन भाटे भगिनींनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव