जळगाव : जळगाव-औरंगाबाद मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर टाकण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे या मार्गावर दररोज वाहतुकीची कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. यामुळे वाहनधारकांसह उद्योजक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्यास बंदी असतानाही या ठिकाणी हे गतिरोधक टाकण्यात आले आहे. अपघात होत असल्याने व्यापाऱ्यांनी हे गतिरोधक टाकले असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले.जळगाव-औरंगाबाद मार्ग अत्यंत वर्दळीचा असून येथे अवजड वाहनांसह लहान-मोठी वाहने नेहमी ये-जा करीत असतात. त्यामुळे येथे पूर्वीपासूनच वाहनांची नेहमी गर्दी असते. असे असताना बाजार समितीसमोर गतिरोधक टाकल्याने वाहन कोंडीत अधिक भर पडली आहे.अपघातामुळे गतिरोधकाचा निर्णयया मार्गावर कृउबातील व्यापारी, आडते व इतर कर्मचारी नेहमी ये जा करीत असतात. या ठिकाणी वारंवार अपघात होऊन अनेकांना दुखापत होण्यासह काही जणांना जीवही गमवावा लागल्याचे सांगत या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी मार्केट यार्ड आडत असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लक्ष्मण पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर येथे हे गतिकरोधक टाकण्यात आले. दररोज संध्याकाळी वाहनांच्या रांगा बाजार समितीसमोर गतिरोधक टाकल्याने येथे दररोज वाहनांची मोठी कोंडी होत आहे. त्यात संध्याकाळी तर थेट ‘लोकमत’ कार्यालय ते अजिंठा चौफुली दरम्यान वाहनांच्या दुतर्फा रांगाच्या रांगा लागत आहे. यात बºयाच वेळा रुग्णवाहिकादेखील अडकल्याची माहिती उद्योजकांनी दिली. इतकेच नव्हे तर प्रसूत महिला, इतर रुग्णही ताटकळत आहेत, अशी वाहनधारकांची तक्रार आहे.उद्योग संघटनांचा विरोधऔद्योगिक वसाहत परिसरात ये-जा करणाºया उद्योजकांची संख्याही मोठी असून दररोज संध्याकाळी येताना ते या वाहन कोंडीत सापडत असल्याने या त्रासामुळे ते त्रस्त झाले आहेत. अर्धा ते एक तास वाहन कोंडीत अडकणे आता दररोजचे झाले असून या वर उपाययोजना करण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. या संदर्भात विविध उद्योग संघटनांनी एकत्र येत या गतिरोधकाच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.महामार्गावर गतिरोधक टाकलेच कसे?राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकता येत नाही. असे असले तरी जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ -एफ या महामार्गावर गतिरोधक टाकलेच कसे, असा संतप्त सवालही उद्योजक, वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.रस्ता खराब, वाहने भरधाव जाणार कशी?हा मार्ग मुळातच खराब झाल्याने जागोजागी असलेल्या खड्ड्यामुळे येथे वाहनांचा वेग कमीच असतो. त्यामुळे भरधाव वेगातील वाहनांमुळे अपघात होणे शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.जनतेला वेठीस का धरतात ?अपघात होत असल्याचे कारण सांगून गतिरोधक टाकले असले तरी बाजार समितीच्या आवारातून येताना वाहनांचा वेग कमी असणे गरजेचे आहे, त्यासाठी बाजार समिती प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक असावे, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे. तसे न करता महामार्गावर गतिरोधक टाकून जनतेला वेठीस का धरत आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.प्रशासनाकडून कारवाई नाहीमहामार्गावर गतिरोधक टाकण्यासाठी किमान १० विभागांची परवानही घ्यावी लागते. मात्र गतिरोधक टाकून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असला तरी वाहतूक पोलीस, प्रशासन काहीच कारवाई का करीत नाही, असा सवालही वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.जळगाव-औरंगाबाद महामार्गावर गतिरोधक टाकल्याने दररोज संध्याकाळी वाहनधारकांना वाहन कोंडीत अडकून ताटकळत रहावे लागत आहे. याची दखल घेणे गरजेचे आहे.- जतीन ओझा, उद्योजक.गतिरोधकामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर वाहनांचा वेग कमी झाल्याने व त्यात संध्याकाळी वाहनांची संख्या वाढून रांगा लागत असल्याने सर्वच जण त्रस्त झाले आहेत.- समीर साने, सचिव, लघु उद्योग भारती.सतत अपघात होत असल्याने जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनने बाजार समितीसमोर गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. त्यानुसार व्यापाºयांनी गतिरोधक टाकले.- लक्ष्मण पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.गतिरोधक टाकण्यासाठी परवनागी घेणे गरजेचे आहे. असे असतानाही बाजार समितीसमोर गतिरोधक टाकताना परवानगी घेतलेली नाही.- देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील गतिरोधकांमुळे उद्योजकांसह वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:52 PM
दररोज वाहतुकीची कोंडी
ठळक मुद्देवाढत्या अपघातामुळे गतिरोधक टाकल्याचे बाजार समितीचे म्हणणेउद्योग संघटनांचा विरोध