जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी बाजार समितीची भींत पाडण्यात आल्याने बाजार समितीमधील व्यापारी संतप्त झाले आहेत.सर्व्हिस रोडच्या नावाखाली सुमारे ३०० मीटर भिंत पडण्यात आल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून यामुळे कोट्यवधींचा माल उघड्यावर पडला आहे, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या विरोधात व्यापाºयांनी सोमवारपसून बंद पुकारण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. महापालिकेने शुकवारी सायंकाळी ७ वाजता पत्र दिले व मध्यरात्री ,साडेतीव वाजेपासून भिंत पडण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे व्यापाºयांनी सांगितले. ही हुकूमशाही सुरू झाल्याचा आरोप जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनने केला आहे.
जळगावात बाजार समितीची भींत पाडल्याने व्यापारी आक्रमक, कोट्यवधींचा माल उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 1:01 PM