शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निधी वर्ग न झाल्यामुळे खांब हटविण्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 10:10 PM

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांब हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंजुर केलेला निधी, अद्याप महावितरणकडे वर्ग केलेला ...

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांब हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंजुर केलेला निधी, अद्याप महावितरणकडे वर्ग केलेला नाही. त्यामुळे खांब हटविण्याचे काम रखडले असल्याची माहिती समोर आली असून, उड्डाणपुलाच्या कामाला दिवसेंदिवस विलंब होत आहे.जीर्ण झालेल्या शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत असून, गेल्या आठवड्यात मक्तेदारातर्फे पाया भरणीच्या कामालादेखील सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, उड्डाणपुलाच्या इतर कामासाठी पत्र्या हनुमान मंदिरपासून ते टॉवरपर्यंत असलेले महावितरणचे विद्युत खांब या कामासाठी अडथळा ठरत आहेत. खांब हटविण्यासाठी लागणाºया निधी संदर्भात महावितरणने मनपाकडे बोट दाखविले होते. तर मनपाने पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असल्याने, त्यांनीच यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. शेवटी जिल्हा प्रशासनाने यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर, महावितरणने या कामासाठी निविदा काढुन, यश इंटरप्राईजेस नावाच्या ठेकेदाराला खांब हटविण्याचा ठेका दिला आहे.खांब हटविण्यासाठी सव्वा कोटींचा निधी मंजूर आहे. त्यामुळे महावितरणने निविदा प्रक्रिया राबवुन ठेकादाराला हे काम दिले. मात्र, निविदा प्रक्रिया होऊन आठवडा उलटला तरी खांब हटविण्यात आलेले नाही.

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव