जळगाव : व्याह्याच्या मुलीच्या लग्नासाठी आलेल्या उज्ज्वला रवींद्र तोंडे (वय ४५, रा.भोपाळ) यांचे ६५ हजार रुपये किमतीचे दागिने व ४० हजार रुपये रोख असा ऐवज असलेल्या बॅगा लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी अंबिका हौसिंग सोसायटीत उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील अंबिका हौसिंग सोसायटी येथील रहिवासी अरुण हरिभाऊ शिंदे यांच्या मुलींचे सोमवारी शिरसोली रस्त्यावरील मंगल कार्यालयात लग्न होते. या लग्नासाठी उज्ज्वला तोंडे या आल्या होत्या़ रविवारी रात्री ११ वाजता सर्व वºहाडींनी जेवण केले़ त्यानंतर उज्ज्वला तोंडे या १२ वाजेच्या सुमारास घराच्या वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेल्या. जाताना त्यांनी त्यांच्या दोन बॅगा सोबत नेल्या. या बॅगा उशाजवळ ठेवून झोपल्या. सकाळी सहा वाजता उठल्यावर बॅगा गायब झालेल्या होत्या. सर्वत्र शोधाशोध करुनही मिळाल्या नाहीत. लग्न असलेल्या मंगल कार्यालयात इतर नातेवाईकांनी या बॅगा नेल्या असाव्यात म्हणून तेथे चौकशी केली, मात्र तेथेही बॅगा आढळून आल्या नाहीत.मोकळ्या प्लॉटमध्ये आढळल्या बॅगाउज्ज्वला तोंडे यांच्या बॅगा शिंदे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका मोकळ्या प्लॉटमध्ये एका नातेवाईकांना आढळून आल्या़ त्यांनी उज्ज्वला यांना फोन करुन सांगितले. दागिने आणि रोख रक्कम काढण्यात आलेली होती़ यात ६५ हजार रुपये किंमतीचे ३३ गॅ्रम वजनाच्या सोन्याची पोत, १० हजार रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ गॅ्रम वजनाचे सोन्याचे कानातील टोंगल आदी दागिन्यांचा समावेश आहे़ याप्रकरणी तोंडे यांनी रामानंद नगर पोलिसात दिलेल्या फिर्याद दिली.
जळगावात लग्नासाठी आलेल्या विवाहितेचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:25 PM
दागिने व रोकड काढून घरापासून काही अंतरावर फेकल्या बॅग
ठळक मुद्देअंबिका हौसिंग सोसायटीतील घटनाभोपाळ येथील महिला