आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.८ :जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनसमोर असलेली चार हिरवीगार झाडे केवळ बैठकीसाठी दोन-तीन महिन्यांनी येणाºया मंत्र्यांच्या वाहनांना पार्र्किंगसाठी नडत असल्याने गुरुवारी तोडून टाकण्यात आल्याचा प्रकार घडला. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना वृक्षतोड केल्यास कारवाईचा बडगा उगारणारी मनपा याप्रकरणी काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नियोजन भवनसमोर सुबाभूळची चार डेरेदार झाडे होती. मात्र नियोजन भवनमध्ये नेहमीच बैठका, कार्यक्रम होत असतात. मंत्र्यांच्या आढावा बैठका होतात. त्या वेळी व्हीआयपींची वाहने उभी करण्यास अडथळा होत होता. सोमवार, ४ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या वेळी या ठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे ही झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवार,७ रोजी नियोजन भवनसमोरील ४ सुबाभूळची डेरेदार झाडे तोडण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच एनआयसी कार्यालयाजवळील दोन झाडेही तोडण्यात आली. मात्र ही सुबाभूळची झाडे असल्याने परवानगीची गरज नसल्याचे सांगण्यात आले. एकीकडे शासनाच्या योजनांनुसार वृक्ष लागवडीचे आवाहन करणारे जिल्हा प्रशासन केवळ व्हीआयपींचे वाहन नियोजन भवनपासून जवळ उभे करता यावे यासाठी वृक्षतोड करीत असेल तर सर्वसामान्यांना वृक्ष लागवडीसाठी कसे प्रवृत्त करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
सुबाभूळच्या झाडांना तोडण्यासाठी परवानगीची गरज नसते. त्यामुळे माझ्या आदेशाने ही झाडे तोडण्यात आली.-किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी.