वासेफ पटेलभुसावळ : पावसाळा सुरू झाला आणि काही दिवसांतच सर्वच रस्त्यांवर जागोजागी जीव घेणे खड्डे व चिखल दिसू लागला आहे. हे खड्डे त्वरेने बुजवण्याचे काम भुसावळ पालिकेने हाती घेण्याची इच्छासुद्धा दाखवली नाही. परिणामी लोकांनी, वाहनचालकांनी ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते’ अशी शेरेबाजी सुरू केली. त्यामुळे सोमवारी भुसावळ शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेनेच्या वतीने कागदी नावा खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात सोडण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ‘पुढे खड्डा आहे, अपघात होऊ शकतो, वाहन सावकाश हाका’ अशा सूचना प्रवाशांना देत झेंडू बाम व आयोडेक्स वाटप केले. तालुका संघटक धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बºहाटे, विभागप्रमुख निखिल बºहाटे, दिव्यांग सेना तालुकाप्रमुख फिरोज तडवी उपस्थित होते.आरोप प्रत्यारोपात जनतेचे हालफक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेच्या समस्या मार्गी लागल्या असत्या तर पालिकेत नगरसेवकांचे काय काम राहिले असते? पालिका निवडणुकीत इतर सर्व पक्षांना नाकारून सत्ताधाऱ्यांना जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले. त्यांनी काम करून दाखवावे. शिवसैनिक नक्कीच त्यांचा सत्कार करतील. स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवकांनी गाडीतून फिरण्यापेक्षा रस्त्यावरून फिरावे आणि रस्ता बनविताना तो पाच वर्षे खराब होणार नाही, याची लेखी हमी विकासकाकडून घ्यावी. अन्यथा सत्ताधाऱ्यांवर भुसावळकरांना खड्ड्य़ात टाकलं, आम्ही करून दाखवलं अशी म्हणण्याची वेळ येईल, सत्ताधाºयांनी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तरी रस्ते दुरुस्त करावे, असे शहरप्रमुख बबलू बºहाटे म्हणाले.भुसावळकरांना झेंडू बाम व आयोडेक्सच्या बाटल्या दिल्यामाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या वर्षी दोन वेळेस भुसावळात आले. तेव्हा नुसत्या देखाव्यासाठी, नंतर गणेश विसर्जन व दुर्गामाता विसर्जन वेळेस खड्डे दुरुस्त केले गेले. यावर्षी समस्या जास्त वाढली तरी दुरुस्ती नाही. अपरिहार्यपणे वाहनांतून प्रवास करावा लागणाºया महिला, बालके, वयोवृद्ध महिला-पुरुष, आजारी रुग्ण, तसेच मानेची व कंबरेची व्याधी सहन कराव्या लागणाºयांना यातून प्रवास करताना आणखी हाल सोसावे लागत आहेत. भुसावळच्या सत्ताधाºयांना खड्डे कमी करता आले नाही. परंतु वेदना वाढवल्या म्हणून स्वखर्चाने शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी ५०० प्रवाशांना झेंडू बाम व आयोडेक्स वाटले.खड्ड्यांना नागरिक वैतागलेसत्ताधाºयांना समाजाचे काहीही सोयरसुतक नाहीय. ‘जनता गेली खड्ड्यात’ असंच त्यांचं वागणं आहे. कोणता नगरसेवक कोणत्या पक्षाकडून पुढील निवडणूक लढेल यातच त्यांना रस आहे. नगरसेवक कंटाळले आहेत आणि त्यामुळेच आता वॉर्डात चांगले कार्य करणाºया आजी माजी नगरसेवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पदरमोड सुरू केली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.गाडी, सायकल किंवा कारऐवजी जणू बैलगाडी चालवतोय असे वाटते. विस्तारलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आणि प्रवाशांवर ‘भिक नको पण कुत्रा आवर,’ असे म्हणण्याची पाळी आली आहे, असे नागरिक म्हणाले.
खड्ड्यांमुळे भुसावळकरांचे हाल, साचलेल्या पाण्यात कागदी नावा उतरवल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 2:51 PM
पावसाळा सुरू झाला आणि काही दिवसांतच सर्वच रस्त्यांवर जागोजागी जीव घेणे खड्डे व चिखल दिसू लागला आहे.
ठळक मुद्देशिवसेनेतर्फे ५०० नागरिकांना वेदनाशामक मलम वाटप करून गांधीगिरीआरोप-प्रत्यारोपात जनतेचे मात्र हाल