मुक्ताईनगर : गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रात तूर खरेदी करताना टोकनप्रमाणे खरेदी न करता व्यापारी व संचालक मंडळाशी लागेबांधे असलेल्यांनाच तूर खरेदीसाठी अग्रक्रम दिला जात असल्याची तक्रार आल्याने तालुका काँग्रेसतर्फे खरेदी केंद्रावर जाऊन कर्मचा:यांना घेराव घालण्यात आला. नेतृत्व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील व प्रभाकर पाटील यांनी केले.शेतकरी हितासाठी शासनाने बोदवड कृउबा समितीच्या मुक्ताईनगर उप बाजारात तूर खरेदी केंद्र सुरू केले आहे. मात्र बाजार समितीच्या उपबाजारातील तूर खरेदी केंद्रावर 15-15 दिवस ते एक महिना शेतकरी तूर घेऊन उभा असून ही त्याची तूर मोजली जात नाही. त्या ऐवजी मोठे व्यापारी व काही राजकीय पुढारी यांच्याकडील तूर मात्र परस्पर खरेदी होत असल्याचा आरोप शेतक:याकडून केला जात आहे या होत असलेल्या दुजाभावमुळे शेतकरी आज कर्मचारी यांच्यात अनेक वादाच्या घटना घडल्या आहेत त्याचा अनुभव आजसुद्धा आला. गुरुवारी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान शेतक:यांना देण्यात आलेल्या टोकन क्रमांकानुसार तूर मोजली जात नसल्याने शेतक:यांनी विरोध केला ही बाब तालुका काँग्रेस पदाधिका:यांना कळताच काँग्रेसचे डॉ.जगदीश पाटील, प्रभाकर पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष यांच्यासह असंख्य कार्यकर्ते खरेदी केंद्रावर धडकले व तूर खरेदीत दुजाभाव होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे केंद्र नेमके व्यापारी/राजकीय पुढा:यांसाठी की शेतक:यांसाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतक:यांची होत असलेली उपेक्षा थांबवावी व टोकन्या क्रमवारीनुसार तूर मोजावी अशी मागणी कॉँग्रेसतर्फे कर्मचा:यांना घेराव घालून करण्यात आली आहे. डॉ.जगदीश पाटील, प्रभाकर पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचा आरोप चुकीचा आहे. अगदी रीतसर टोकन नुसार व शेतक:यांना प्राधान्य देऊनच तूर खरेदी केली जात आहे, विरोधकांनी राजकारण करू नये.- निवृत्ती पाटील, सभापती कृउबा समिती,बोदवडतूर खरेदी करताना शेतक:यांना प्राधान्य व टोकन क्रमांकावर तूर खरेदी करणे आवश्यक असताना व्यापारी व पुढा:यांना प्राधान्य दिले जात आहे हे चुकीचे आहे,यात बदल झाला नाही तर काँग्रेस खरेदी केंद्रावर आंदोलन करेल.- डॉ. जगदीश पाटील, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस
खरेदी केंद्रावर तूर खरेदीत दुजाभाव
By admin | Published: April 21, 2017 12:31 AM