ऑनलाईन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 23 - बारा वर्षे सेवा झालेल्या होमगार्डस्ना सेवेतून कमी करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा धसका घेतल्याने येथील महिला होमगार्ड छाया कयास्ते यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे भाऊ व होमगार्डमधून कमी करण्यात आलेले त्यांचे भाऊ परमेश्वर कयास्ते यांनी दिली.येथील होमगार्ड पथकातील महिला होमगार्डस् छाया कयास्ते (वय 40) यांचे 21 रोजी रात्री 8.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले असले तरी होमगार्डस्ना सेवेतून कमी केले जात असल्याने व त्यांचा भाऊ परमेश्वर यांनाही कमी करण्यात आल्याने आता काय करावे या विवनचनेत त्यांचे निधन झाल्याचे घरच्यांनी कळविले.काही दिवसांपूर्वी शासन निर्णयानुसार 12 वर्षावरील सेवेत असणा:या होमगार्डस्ना कमी करण्यात आलेले होते. त्या आदेशाअन्वये परमेश्वर अंबादास कयास्ते यांना सुद्धा कमी करण्यात आलेले आहे. त्यांना होमगार्डस् व्यतिरिक्त उत्पन्नाचे कुठलेही साधन नसल्यामुळे या मानसिक धक्क्याने त्यांचा आजार बळावला व 21 रोजी रात्री 8.30 वाजता त्यांचे निधन झाले.शासन निर्णयामुळे त्यांचे व त्यांचे परिवारावर आज ही वेळ आली आहे असे येथील होमगार्डस्ेचे म्हणण आहे. आदेश रद्द झाल्यावर सुद्धा उर्वरित होमगार्डस्ना शासनाने अद्याप सेवेत सामावून घेतलेले नाही. त्यांना सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी करण्यात आली. छाया कयास्ते यांच्या पश्चात मुलगी आहे. त्यांना होमगार्डस् पथकाने श्रद्धांजली अर्पण केली.