जळगाव : गुरांसाठी विहिरीतून पाणी काढत असताना ठिबक नळीत पाय अडकून तोल गेल्याने गोरख जगन पाटील (३५) या तरुण शेतकºयाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मुसळी, ता.धरणगाव येथे शनिवारी दुपारी घडली. डोक्याला मार तसेच पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून पाटील यांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गोरख पाटील हे शनिवारी शेतात काम करीत असताना दुपारी गुरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीजवळ आले. त्यांची विहीर सुमारे ४० फूट खोल आहे. वीज नसल्याने बादलीने पाणी काढताना बादलीला बांधलेल्या ठिबकच्या नळीत त्यांचा पाय अडकला आणि त्यातच तोल जावून ते बादलीसह विहिरीत पडले. विहिरीत दहा फूट पाणी होते त्यांना पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. आवाज येताच धावले गुराखीगोरख यांचे कुटुंब दुसºया शेतात होते. पाटील विहिरीत पडल्याने आवाज झाला. त्यामुळे शेजारील शेतामध्ये गुरे चारणाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत डोकावल्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात आणला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.
पाणी काढताना तोल जावून विहिरीत पडल्याने शेतकºयाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 9:16 PM
गुरांसाठी विहिरीतून पाणी काढत असताना ठिबक नळीत पाय अडकून तोल गेल्याने गोरख जगन पाटील (३५) या तरुण शेतकºयाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मुसळी, ता.धरणगाव येथे शनिवारी दुपारी घडली. डोक्याला मार तसेच पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून पाटील यांचा मृत्यू झाला.
ठळक मुद्दे जळगाव जिल्ह्यातील मुसळी येथील घटना गुरांसाठी काढत होते पाणी