आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२६ : जेवणानंतर आराम करण्यासाठी ट्रकचालक रणवीरसिंग दिपसिंग शेखावत (३०) हा खाटेवर झोपला असताना त्याचा पाय कुलरला लागताच विजेचा शॉक बसून रणवीरचा जागेवरच मृत्यू झाला़ ही घटना भुसावळ रस्त्यावरील हॉटेलवर शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली़ यावेळी खाटेवर बसलेला क्लिनर सुरेंद्र रोयर यालादेखील किरकोळ शॉक लागला़ सुदैवाने तो बचावला़ याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़मोरवी (गुजरात) येथून आर.जे. ०७ जी.डी. १७९५ या क्रमांकच्या ट्रकमध्ये टाईल्स भरून चालक रणवीरसिंग शेखावत हा ओरिसा येथे जाण्यासाठी निघाला होता. शुक्रवारी दुपारी या वाहनावरील चालक भुसावळजवळ असलेल्या ढाब्यावर जेवणासाठी आले होते. चालकांनी जेवण केल्यानंतर रणवीरसिंग हा खाटेवरती आराम करण्यासाठी लोळला असता त्याच्या पायाचा स्पर्श कुलरच्या जाळीला लागून त्याला जोरदार शॉक लागला. तो कुलरलच चिटकला़ हा प्रकार लक्षात आल्यानंतर ढाबा मालकसह अन्य सोबतच्या ट्रकवरील चालकांनी रूग्णवाहिका बोलवून रणवीरसिंग यास जिल्हा रुग्णालयात हलविले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषीत केले.