आॅनलाईन लोकमतजळगाव दि २१, : नळाला आलेले पाणी भरत असताना विद्युत पंपाचा शॉक लागल्याने इमरान हसन पिंजारी (वय २८ रा.दत्त नगर, मेहरुण जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे चार वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मेहरुणच्या दत्त नगर भागात गुरुवारी पहाटे चार वाजता नळाला पाणी आले होते. त्यामुळे इमरान व पत्नी जिशान असे दोघं जण पाणी भरण्यासाठी उठले. विद्युत पंप लावून पाणी भरत असताना या पंपात वीज प्रवाह उतरला होता. त्याला इमरान याचा स्पर्श झाल्याने तो फेकला गेला. हा प्रकार लक्षात येताच पत्नी व गल्लीतील लोकांनी तातडीने इमरानला जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. इमरानच्या शरीरावर कोणीतच जखम नव्हती, त्यामुळे शॉक लागल्यामुळेच त्याचा मृत्यू झालेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर पोलीस कर्मचारी सतीश डोलारे व प्रशांत चौधरी यांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात दिला. त्यानंतर अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
जळगाव शहरात पाणी भरताना विद्युत पंपाचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 4:38 PM
नळाला आलेले पाणी भरत असताना विद्युत पंपाचा शॉक लागल्याने इमरान हसन पिंजारी (वय २८ रा.दत्त नगर, मेहरुण जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे चार वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे दत्त नगरातील घटना कुटुंबातील कर्ता तरुण गेल्याने आक्रोशवडीलांचेही झाले आहे निधन